आजोळ : मुलांसाठी घराबाहेरचे घर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

आई बाबा ऑफिसला गेल्यानंतर मुलांची उत्तम व्यवस्था, काळजीपूर्वक संगोपन, सर्वांगीण विकास, चविष्ट जेवण, अनुभवी प्रशिक्षित स्टाफ आणि बरंच काही म्हणजे आजोळ.

आई बाबा ऑफिसला गेल्यानंतर मुलांची उत्तम व्यवस्था, काळजीपूर्वक संगोपन, सर्वांगीण विकास, चविष्ट जेवण, अनुभवी प्रशिक्षित स्टाफ आणि बरंच काही म्हणजे आजोळ. दिवसभर ऑफिससाठी घराबाहेर असणाऱ्या पालकांना निश्‍चिंतपणे काम करू देण्याची संधी उपलब्ध करून देणारी अनुभवी संस्था म्हणजेच आजोळ. 

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

आजोळच्या संचालिका सौ. मोनिका कुलकर्णी यांनी समाजाची शास्त्रीय व व्यावसायिक पाळणाघराची गरज जाणून १९९८ साली आजोळ स्थापन केले. पाळणाघर चालविणे ही एक मोठी जबाबदारी आहे हे ओळखून त्यांनी न्यूझीलंड येथील कॉलेजची पदवी शिक्षण घेतले. बाल मानसशास्त्राचा सखोल अभ्यास केला, तसेच सिंगापूरमधील विद्यापीठातून प्रशिक्षण घेतले. आजोळमध्ये एकदा मूल आले की उत्तम जडणघडण होऊन परिपूर्ण व्यक्तिमत्त्व घडावे हा त्यामागचा विचार. अगदी तीन महिन्यांच्या बाळापासून दहा, बारा वर्षांच्या मुलांपर्यंत सगळे आनंदाने येथे येतात. मुलांना हवी असलेली प्रत्येक गोष्ट आजोळने मुलांपर्यंत पोचवली आहे. समवयस्क मित्रमैत्रिणी, स्वच्छ मोकळी जागा, आनंदी वातावरण, भरपूर खेळणी, सर्वांगीण विकासासाठी असलेले नवनवीन उपक्रम यामध्ये मुले रमतात आणि येथे येण्यास उत्सुक असतात. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आजोळला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. बावीस वर्षांच्या अविरत सेवेमुळे तयार होत असलेली पिढी ही विचारी, स्वावलंबी, प्रयत्नशील आहे. समाजात ठामपणे पाऊल टाकताना ही पिढी आत्मविश्वासाने पुढे जात आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात दमदार कामगिरी करताना पाहून आजोळचे उद्दिष्ट पूर्ण होत असल्याचे समाधान वाटते. या मुलांचा आजोळ परिवाराला अभिमान वाटतो. सुरुवातीला नवी पेठ येथे केवळ ४०० स्वे. फूट जागेत लावलेले आजोळच्या रोपट्याचे आता विशाल वृक्षात रूपांतर झाले आहे. उत्तम व्यवस्थापन असल्यामुळे  आजोळवर पालकांचा विश्वास दृढ झाला आणि एकेक सेंटर वाढत जाऊन २५ शाखांपर्यंत ब्रॅंड आजोळने  मजल मारली आहे. पुण्यापुरता सीमित असणारा ब्रॅंड आजोळ लवकरच भारतात आपल्या शाखा विस्तारण्यास सज्ज आहे.

अधिक माहितीसाठी : www.aajol.com, www.aajolfrainchsee.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brands of pune : information about aajol