कोराझोन होम्स : संघर्षातून उभारणी केलेले कोराझोन होम्स

corazon.jpg
corazon.jpg

पुणे शहरातील गृहप्रकल्प विक्रीतील नामांकित असलेल्या कोराझोन होम्सने देशभरात आज आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुण्यासह मुंबई, दिल्ली, बंगलोर या शहरातही कोराझोन कंपनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

कोराझोन कंपनी : कंपनीचे प्रमुख प्रवीण लहू गवळी यांनी पुणे शहरासह जागतिक पातळीवर कोराझोन कंपनीच्या माध्यमातून आपले अस्तित्व, आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज ‘कोराझोन’ हे  गृहप्रकल्प विक्रीतील मोठे नाव बनले आहे. गवळी यांनी केवळ दोन वर्षे नोकरी केल्यानंतर व्यवस्थापक पदाचा राजीनामा देत २०१३ साली ‘कोराझोन’ या गृहप्रकल्प विक्री कंपनीची स्थापना करून गृहप्रकल्प विक्री, मार्गदर्शनाला सुरुवात केली. 

उच्चशिक्षण घेऊन हातात व्यवस्थापकपदाची व उत्तम पगाराची नोकरी असताना ती सोडून अनिश्‍चिततेच्या गर्तेत घेतलेली उडी भविष्यात कुठे घेऊन जाईल याचा कसलाही अंदाज नसताना या क्षेत्रात प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात कुठलाही आशेचा अंधुकसा किरण दिसत नव्हता. केवळ अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवत लौकिक आयुष्य पणाला लावून एका वेड्या स्वप्नांचा पाठलाग करणे ही सामान्य गोष्ट नव्हती. तरीही अशा परिस्थितीतून सर्व काही उभे करणे प्रवीण यांनी शक्‍य करून दाखवले व ‘कोराझोन’ सारख्या नामांकित कंपनीची धुरा यशस्वीपणे सांभाळत मजबूतही केली. यातून अनेक बांधकाम व्यावसायिक, बॅंका यांच्याशी जवळचे संबंध तयार झाले. काही हजारात सुरू झालेली ही कंपनी आज कोटींच्या उलाढाली करत असून कमी वयात घेतलेला निर्णय आज पूर्णपणे यशस्वी झाल्याचे प्रवीण गवळी सांगतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उल्लेखनीय : सचोटी व विश्‍वासाच्या बळावर पुणे शहरातील अनेक गृहप्रकल्पांची विक्रमी विक्री करण्यात कोराझोनचा महत्त्वाचा वाटा आहे. 

  •  मंदीच्या काळातही कंपनीने अनेक गृहप्रकल्पांची यशस्वीपणे विक्री करून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 
  •  घरांच्या विक्रीसह मार्गदर्शन, कर्जाबद्दल मार्गदर्शन, सल्ला देणे यासाठी कोराझोन पुणे शहरातील एक नामांकित व अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जात आहे. 
  •  आज कोराझोनच्या माध्यमातून दीडशेपेक्षा अधिक युवक युवतींना रोजगार मिळवून देऊ शकल्याने त्याचेही एक वेगळे समाधान आहे. 
  • स्थावर मालमत्तेच्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल कोराझोन कंपनीला २०१८-१९ या एका वर्षात ७० हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
  •  सर्वत्र मंदीचे वारे वाहत असतानाही कोराझोन कंपनीच्या सचोटी व विश्‍वसनीयता यांमुळे अनेकांनी कंपनीच्या वतीने गृहप्रकल्पात आपली घरे खरेदी केली असून ही कोराझोनवरील दृढ विश्‍वासाची मोहोर आहे.

अधिक माहितीसाठी :

संपर्क - ७२७६००४८८४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com