के. के. ट्रॅव्हल्स : उत्कृष्ट प्रवास म्हणजे के. के. ट्रॅव्हल्स

KK-Travels
KK-Travels

प्रवासाला जायचे म्हणजे सगळ्यांच्या विश्‍वासाचे नाव के. के. ट्रॅव्हल्स. आज तीन मोठ्या शहरात आपले कार्यालय असणाऱ्या के. के. ट्रॅव्हल्सची सुरुवात १९८८ मध्ये पुणे शहरातून एका कारसह, कारभाड्याने देण्यापासून झाली. त्यानंतर कंपनीने कर्मचारी वाहतुकीसाठी करार केले होते. १९९५ मध्ये मुंबई विमानतळ ऑपरेशन आणि २००६ मध्ये नाशिक कार्यालय सुरू झाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज या घडीला के. के. ट्रॅव्हल्सची महाराष्ट्रातील पुणे, मुंबई आणि नाशिक या तीन प्रमुख शहरांत कार्यालय आहेत. हजारो प्रवाशांचा अनुभव, विश्‍वास आणि उत्कृष्ट कामाची नोंद म्हणजे पर्यटन मंत्रालय, भारत सरकार यांनी पर्यटन परिवहन ऑपरेटर म्हणून के. के. ट्रॅव्हल्सला मान्यता दिली आहे. के. के. ट्रॅव्हल्सला गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरमच्या वतीने २२ फेब्रुवारी २०२० रोजी दुबई येथे व्यवसाय उत्कृष्टता पुरस्कार प्राप्त झाला आहे. सध्या एकूण ३०० गाड्या कार्यरत आहेत. संपूर्णपणे व्यावसायिक, उत्कृष्ट नियोजन करताना आज के. के. ट्रॅव्हल्स म्हणजे लोकांच्या विश्‍वासाचे दुसरे नाव झाले आहे. 

कोविड परिस्थिती : सध्या उद्‌भवलेल्या कोविड १९ च्या संकटात के. के. ट्रॅव्हल्सने वाहने लॉकडाऊनमध्ये थांबविली; परंतु संपूर्ण भारतात अडकलेल्या प्रवाशांसाठी आंशिक ऑपरेशन्स दिल्ली, बंगळुरू, जयपूर, हैदराबाद, सिलिगुडी येथून सुरू आहेत. या काळात के. के. ट्रॅव्हल्समध्ये कारमधील वाहनचालकांची दैनंदिन तापमान तपासणी, मास्क असलेली ट्रॅव्हल किट, सॅनिटायझर, ड्रायव्हर्स व प्रवाशांना दास्ताने या सावधानता पाळल्या जातात. संकटकाळी ही इतकी सावधानता के. के. ट्रॅव्हल्सकडून पाळली जात आहे. लॉकडाउन नंतर प्रवाशांच्या सेवेत पुन्हा २४ x ७ रुजू होणार आहे. त्यामुळेच तर प्रवाशांच्या नजरेसमोर प्रवास म्हटले की खात्रीचे नाव येते. के. के. ट्रॅव्हल्स.

के. के. ट्रॅव्हल्सची वैशिष्ट्ये -
आयएसओ ९००१ : २०१५
ट्रेडमार्क नोंदणीकृत
बुकिंग प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत आहे. वेब 
बुकिंग, ॲप बुकिंग, व्हॉट्‌सॲप बुकिंगचे पर्याय
स्वतःचे कॉल सेंटर
एकूण ३०० गाड्या कार्यरत

अधिक माहितीसाठी - www.kktravels.com संपर्क : ९८२२९७९७९७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com