टिळक महाराष्ट्र विद्यापीठ : दर्जेदार शिक्षणाची शतकी परंपरा

Tilak-Maharashtra-University
Tilak-Maharashtra-University

राष्ट्रीय शिक्षण या संकल्पनेचे जनक व प्रवर्तक लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९२१ मध्ये महात्मा गांधीनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना केली. हे विद्यापीठ १०० व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. ‘टिमवि’च्या कौशल्य विकास विभागातर्फे उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे, रोजगार देणारे, प्रमाणपत्र आणि डिप्लोमा अभ्यासक्रम राबवले जातात. जागतिक बाजारपेठेच्या गरजा लक्षात घेऊन नव्या दमाचे तरुण प्रोफेशनल्स तयार होतील, अशा अभ्यासक्रमांची आखणी ‘टिमवि’ने केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्यवस्थापन, वाणिज्य आणि हॉटेल मॅनेजमेंट या विभागांतर्गत अनेक उपयुक्त कोर्सेस राबवले जातात. फायनान्स, ह्यूमन रिसोर्स, मार्केटिंग या विषयात ‘टिमवि’मध्ये ‘एमबीए’ अभ्यासक्रम उपलब्ध असून तो ‘एआयसीटीई’ मान्यताप्राप्त आहे. विधी अभ्यासक्रमासाठी ‘एलएलबी’ त्याचबरोबर ‘बीए’, ‘एलएलबी’चाही पर्याय ‘टिमवि’त उपलब्ध आहे. ‘एमएसडब्ल्यू’ हा देखील विद्यार्थिप्रिय अभ्यासक्रम असून तो पूर्ण करणाऱ्‍या विद्यार्थ्यांना असंख्य संधी उपलब्ध होत आहेत.

भारतीय विद्या, संस्कृत, जपानी आणि योग या विषयांवरील एमए अभ्यासक्रम, न्यूट्रिशन अ‍ॅण्ड फूड सायन्समधील एमएससी अभ्यासक्रम, एमएससी कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशनस हे अभ्यासक्रमदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हेल्थ सायन्समध्ये  ‘बीएससी’ (नर्सिंग), ‘बीपीटी’ (फिजिओथेरपी) आणि ‘बीफार्म’ हे कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. बीए पदवीसाठी जपानी, योग आणि संस्कृत हे विषय देखील उपलब्ध आहेत. ‘टिमवि’तून बाहेर पडलेल्या पदवीधराला हॉटेल, विमान व उड्डयन क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, मीडिया इंडस्ट्री यात खूप वाव आहे. कौशल्य विकास प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अर्थार्जनाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तयार केले गेले आहे.

प्रमाणपत्र अभ्यासक्रमात रेडिओ जॉकी आणि व्हॉइस टेक्निक्स्, पत्रकारिता, डिजिटल फोटोग्राफी, क्रिएटिव्ह आर्ट्स यांचा तर पदविका अभ्यासक्रमात जपानी भाषा, फिल्म मेकिंग, सायबर सिक्युरिटी, सायबर फॉरेन्सिक या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्याशिवाय साउंड रेकॉर्डिंग टेक्नॉलॉजी, व्हिडिओ प्रॉडक्शन, म्युझिक प्रॉडक्शन यांचा अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमाही उपलब्ध आहेत.

वैशिष्ट्य - बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची आखणी, कॉर्पोरेट्ससोबत सहकार्य करार, आंतरराष्ट्रीय परिषदा व प्रकाशन, बिझनेस लॅब. कॉम्प्यूटर सायन्स विभागातर्फे बीसीए (सायबर सिक्युरिटी आणि गेम्स) एमएससी (आयटी) हे कोर्स राबवले जातात.

मास कम्युनिकेशन विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या कोर्समध्ये प्रॅक्टिकलला खूप महत्त्व दिलं जातं. पुण्यातला सर्वांत मोठा साऊंड स्टुडिओ ‘टिमवि’च्या मास कम्युनिकेशन विभागाचा आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना एडिटिंग, डबिंग, कॅमेरा, बुलेटिन प्रॉडक्शन प्रत्यक्ष शिकवले जाते व सराव करून घेतला जातो. लंडनस्थित अँविड या कंपनीशी टायअप असलेली आणि त्यांचे सर्टिफिकेट कोर्स देणारी ‘टिमवि’ ही भारतातील एकमेव संस्था आहे. 

संकेतस्थळ : www.tmv.edu.in 
www.tmvmassmedia.com
०२०-२४४०३०००, ९११२२ ४९३७२

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com