पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाला लॉकडाउनमुळे `ब्रेक`

महेंद्र शिंदे
रविवार, 24 मे 2020

तीन महिन्यांपूर्वी वेगात सुरू झालेल्या पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लॉकडाउनमुळे ब्रेक लागला आहे. त्यातच काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून सध्या मजुरांची कमतरता आहे.

खेड-शिवापूर (पुणे) : सुमारे तीन महिन्यांपूर्वी वेगात सुरू झालेल्या पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लॉकडाउनमुळे ब्रेक लागला आहे. त्यातच काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून सध्या मजुरांची कमतरता आहे. या परिस्थितीत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुन्हा सुरू होण्यास पावसाळा संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

खासदारपदाच्या हॅटट्रिकच्या वर्षपूर्तीनिमित्त सुप्रिया सुळे यांनी केलाय `हा` संकल्प

गेल्या अनेक वर्षांपासून पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने केलेल्या आंदोलनामुळे या रस्त्याच्या कामाला वेग आला होता. मात्र, त्यात लॉकडाउन झाले आणि या रस्त्याच्या कामाला ब्रेक लागला. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे सर्व काम ठप्प आहे. अजूनही या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मोठया प्रमाणावर बाकी आहे.

पुण्यातील पोलिसांनी घडविले `असे` माणुसकीचे दर्शन...

लॉकडाऊनमुळे काम थांबले नसते तर या पावसाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले असते. मात्र, सध्या वरवे येथील उड्डाणपुलाचे काम मोठया प्रमाणात अपूर्ण आहे. चेलाडी फाट्यावरील उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अपूर्ण आहे. कामथडी येथील उड्डाणपूलाचेही काम बाकी आहे. तर सारोळा येथील उड्डाणपुलाची एक बाजू अपूर्ण आहे. तसेच सेवा रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि देखभाल दुरुस्तीची अनेक कामे अपूर्ण आहेत. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

सध्या लॉकडाउन सुरू असून रस्त्याचे काम करणारे मजूर गावी गेले आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यास अडचणी येत आहेत. पावसाळा संपल्यानंतर रुंदीकरणाचे काम पूर्णपणे सुरु होईल. तोपर्यंत रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे सुरू करण्यात येणार आहेत," असे रिलायन्स इन्फ्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break due to lockdown on Pune-Satara road