काय म्हणावं या जोडप्याला; कुलूप तोडून बळकावलं बंद रो हाऊस!

रवींद्र पाटे
Friday, 30 October 2020

बंद रो हाऊसचे कुलुप तोडून रो हाऊस बेकायदेशीररीत्या बळकावल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.ही घटना नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हेमळा(ता. जुन्नर) येथे घडली.

नारायणगाव - बंद रो हाऊसचे कुलुप तोडून रो हाऊस बेकायदेशीररीत्या बळकावल्या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.ही घटना नारायणगाव ग्रामपंचायत हद्दीतील कोल्हेमळा(ता. जुन्नर) येथे घडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या प्रकरणी सुलभा चंद्रशेखर  को-हाळे (वय ४९, राहणार नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून संग्राम जगन्नाथ घोडेकर,रत्ना संग्राम घोडेकर (दोघे राहणार नारायणगाव तालुका जुन्नर) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. जुन्नर न्यायालयाने आरोपींचा जमीन मंजूर केला आहे.अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय  गुंड यांनी दिली.

गुऱ्हाळात अडकून पडलेल्या मजुरांची दिवाळी होणार गोड; वेठबिगारीतून प्रशासनाने केली सुटका

सुलभा को-हाळे यांचे कोल्हेमळा येथील जमीन सं न 261 / 2 मध्ये रो हाऊस (नंबर १०५) आहे. रो हाऊस कुलूप लावून बंद करण्यात आले होते.२३ ऑक्टोबर २०२० ते २४ ऑक्टोबर २०२० दरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून  घोडेकर दाम्पत्याने को-हाळे यांच्या पूर्व परवानगीशिवाय रो हाऊसचा ताबा घेतला. सद्यस्थितीत हे  दाम्पत्य रो हाऊस मध्ये अनाधिकृतपणे  राहत आहे.या प्रकरणी को-हाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Break the lock and grab the closed row house by couple crime