Breaking news : पुण्यात होणार केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण केंद्र  

उमेश शेळके
Friday, 30 October 2020

प्रशिक्षण केंद्रात माध्यमातून निवडणूक विषयक कामाची माहिती देणे, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, त्यांच्या निवास व्यवस्था आदी सोयी सुविधा असणार आहेत.

पुणे : यशदाच्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पुणे शहरात प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शहरातील तीन जागांची पाहणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, या प्रशिक्षण केंद्रात माध्यमातून निवडणूक विषयक कामाची माहिती देणे, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण, त्यांच्या निवास व्यवस्था आदी सोयी सुविधा असणार आहेत. हे केंद्र महाराष्ट्रासह चार राज्यांना उपयुक्त ठरणार आहे. 

या केंद्रासाठी सुमारे दोन एकर जागेची निवडणूक आयोगाला आवश्‍यकता आहे. त्यासाठी बावधन, ताथवडे आणि वाघोली येथील जागांची पाहणी करण्यात आली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशिक्षण या केंद्रातून दिले जाणार आहे.

हे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग

यापूर्वी अशा प्रकारचे प्रशिक्षण हे प्रामुख्याने यशदा येथे होते. आता मात्र निवडणुक आयोगाला हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. या केंद्रामध्ये सभागृह, ग्रंथालये, अधिकाऱ्यांसाठी राहण्याची सोय सुध्दा असणार आहे.

हे वाचा - पाकच्या संसदेत मोदी नामाचा घोष

पुणे येथील हे प्रशिक्षण केंद्र विमानतळ, रेल्वे आदींच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांमधील अधिकारी त्याचबरोबर बाहेरील राज्यांमधील अधिकाऱ्यांना सुध्दा हे केंद्र सोयीचे असणार आहे. त्यामुळे पुणे येथेच हे केंद्र व्हावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Breaking news: Central Election Commission's training center to be set up in Pune