

Manchar Achieves Milestone with First Successful Galaxy Spiral Lens Implantation
Sakal
-डी. के. वळसे पाटील
मंचर : मंचर(ता.आंबेगाव)येथे गाडे नेत्र रुग्णालयात प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सचिन गाडे यांनी ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॅा कैलास धायबर(रा.मंचर) यांच्या दोन्ही डोळ्यांतील मोतीबिंदू शस्त्रक्रियेदरम्यान Rayner Galaxy Spiral ही अत्याधुनिक इंट्राओक्युलर लेन्स यशस्वीरीत्या प्रत्यारोपित केली.या प्रगत प्रीमियम लेन्स तंत्रज्ञानाचा हा पहिलाच वापर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात यशस्वी झाला आहे.शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला अधिक स्पष्ट, स्थिर व उच्च-गुणवत्तेची दृष्टी मिळाल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.