#TuesdayMotivation : आईकडून मिळाले कर्करोगाविरोधात हिमतीने लढण्याचे धडे

Breast Cancer Awareness Month
Breast Cancer Awareness Month

पुणे - माझ्या आईला स्तनाचा कर्करोग होता. पण, ती त्याच्या विरोधात लढली. तिचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगानं नाही झाला. म्हणून तिनं लढाई जिंकली... आदिती बोलत होती...

कर्करोगाच्या वेदना मी जवळून पाहिल्या आहेत. पण, माझ्या आईने या प्रत्येकवेळी वेदानांना चितपट केल्याचेही पाहिलंय. त्यातूनच कर्करोगाच्या विरोधात हिमतीने लढण्याचे धडेही मला तिच्याकडून मिळाले. माझ्या आईच्या वेळी कर्करोग लवकर कळलाच नाही. पण, मी सावध आहे. दरवर्षी मी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेते... एका खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या आदिती आपला अनुभव ‘सकाळ’बरोबर ‘शेअर’ करत होत्या... निमित्त होतं ते स्तनाच्या कर्करोगबद्दलच्या जनजागृती महिन्याचं.

आपल्या आईला, आजीला किंवा रक्ताच्या नात्यातील इतर कोणालाही स्तनाचा कर्करोग झालेला असेल तर त्या कुटुंबातील विशेषतः स्त्रियांना याबद्दलची भीती अधिक जाणवते. मात्र, एक प्रकारे अशा स्त्रियांचं प्रतिनिधित्व आदिती यांनी केलं. 

याबद्दल बोलताना कर्करोग तज्ज्ञ डॉ. अनंतभूषण रानडे म्हणाले, ‘‘घरात यापूर्वी कोणाला स्तनाचा कर्करोग झालेला असल्यास त्याच्या पुढच्या पिढीला त्याची शक्‍यता जास्त असते. मात्र, तो सर्वांनाच होईल असेही नाही. सुरवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान झाल्यास तो लवकर बरा होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण उपचारांनंतर पूर्ववत आयुष्य जगू शकतात. त्यासाठी कर्करोगाच्या सुरवातीच्या टप्प्यात निदान होऊन त्यावर प्रभावी औषधोपचार करणे आवश्‍यक असते.’’ 

कर्करोग तज्ज्ञ डॉ. अमित भट्ट म्हणाले, ‘‘प्रत्येक रुग्णाचे उपचार हे वगळे असतात. एका रुग्णाला दिलेले उपचार हे दुसऱ्या रुग्णाला तितक्‍याच प्रभावीपणे उपयुक्त ठरतील, असे नाही. स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांना तोंडावाटे औषधे देऊन किमोथेरपीचे उपचार करता येतात. स्तनाचा कर्करोग भारतीय स्त्रियांमध्ये सर्वाधिक जास्त सापडतो. याचे प्रमाण गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या प्रमाणापेक्षा पुढे गेले आहे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com