‘ब्रेक्‍झिट’नंतर सांस्कृतिक क्षेत्राला फटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पुणे - ‘‘ब्रेक्‍झिट’च्या निर्णयानंतर ब्रिटनला मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांना तोंड द्यावं लागेल, अशी परिस्थिती उद्भवली आहे. या अनिश्‍चिततेचा सर्वाधिक फटका कलेच्या क्षेत्राला बसेल. कुठल्याही प्रकारच्या निधी कपातीची झळ सर्वांत आधी कला आणि सांस्कृतिक क्षेत्रालाच सोसावी लागेल, यात शंका नाही. शिवाय ब्रिटनचे इतर युरोपीय देशांशी असणारे सांस्कृतिक संबंधही टिकून राहणे कठीण होईल,’’ अशा शब्दांत शेक्‍सपिअरचे विख्यात ब्रिटिश अभ्यासक आणि समीक्षक ॲन्ड्य्रू डिक्‍सन यांनी काळजी व्यक्त केली.

ब्रिटिश कौन्सिलने आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त डिक्‍सन नुकतेच पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला.
डिक्‍सन म्हणाले, ‘‘जगात सध्या झपाट्याने गोष्टी घडत आहेत, अशावेळी निदान आशादायी राहण्याचा पर्याय आपल्यापुढे असल्यास, तो उपयोगात आणायला हवा. अमेरिकेतला ट्रम्प यांचा विजय असेल किंवा त्याआधी काही दिवस घडलेला आमच्याकडचा ब्रेक्‍झिटचा ऐतिहासिक निर्णय, अशा काळातही कलेने आणि कलाकारांनी पाय रोवून उभं राहण्याची गरज आहे.’’

शेक्‍सपिअरविषयी ते म्हणाले, ‘‘ब्रिटनसोबतच भारत, अमेरिका, जर्मनी, दक्षिण आफ्रिका आणि चीनसारख्या देशांपर्यंत शेक्‍सपिअरचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास केला जात असल्याचे मला लक्षात आले. या वेगवेगळ्या देशांत त्यांचे लेखन अनुवादित केले जाते, त्यांच्यावर नवनवे संशोधन प्रकल्प राबवले जातात. प्रत्येक ठिकाणी तिथल्या सांस्कृतिक- सामाजिक संदर्भांवर आधारित ‘शेक्‍सपिअर समजून घेणे’ त्याच्या जाण्यानंतर चारशे वर्षांनीही सुरूच आहे.’’

शेक्‍सपिअर तर ‘सेक्‍युलर गॉड’च!
शेक्‍सपिअर अजूनही ‘जिवंत’ आहे, असे म्हटल्यास त्यात काहीही चुकीचे ठरू नये. बायबलच्या खालोखाल शेक्‍सपिअरच्या लेखनाचे अनुवाद जगभर पोचले आहेत, यापेक्षा या लेखकाच्या जिवंतपणाचा अजून काय तो वेगळा पुरावा द्यायला हवा? खरं सांगायचं तर सर्वांचा आपला लेखक आहे.

एखाद्या दैवताच्याच जागी ठेवायचं झालं तर मी त्याला ‘सेक्‍युलर गॉड’च म्हणेन! भारतात त्याच्या लेखनावर माध्यमांतर होत दिग्दर्शक विशाल भारद्वाज सारख्यांनी काढलेले चित्रपट मी स्वतः पाहिले आणि थक्कच झालो, असे ॲन्ड्य्रू डिक्‍सन म्हणाले.

Web Title: Brekjhita the cultural sector to be hit