सावधान ! पुण्यात असाही घातला जातोय गंडा; व्यावसायिकाला ८ लाख रूपयांचा फटका

bribe of Rs 8 lakh to a businessman under the pretext of providing loan for business
bribe of Rs 8 lakh to a businessman under the pretext of providing loan for business
Updated on

पुणे : इलेक्ट्रॉनिक वस्तु बनविण्याच्या व्यावसायवृद्धीसाठी व्यवसायासाठी दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो, असे सांगुन एका वित्त पूरवठा कंपनीने व्यावसायिकाची तब्बल सव्वा आठ लाख रुपयांची फसवणुक केली. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

याप्रकरणी संग्राम सबनीस (वय ४८, रा. हडपसर ) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संग्राम सबनीस यांचा इलेक्ट्रॉनिक वस्तु निर्मितीचा व्यावसाय आहे. त्यांना व्यावसायवृद्धीसाठी कर्जाची आवश्यकता होती. त्यासाठी ते प्रयत्न करत होते. दरम्यान, त्यासाठी त्यांनी त्यांनी ऑनलाईन माध्यमाद्वारे चौकशी केली होती.
----------------
जिओमध्ये आणखी एक मोठी गुंतवणूक; आता कोणी केली गुंतवणूक?
----------------
चांगली बातमी : भारतात कोरोनावरील दुसरी लसही विकसित
----------------
दरम्यान, सबनीस यांना सहा जानेवारीला एका अनोळखी व्यक्तीचा त्यांच्या मोबाईलवर फोन आला. "आपण नवरत्न फायनान्स कंपनीतून बोलत आहे. तुम्हाला व्यावसायासाठी आमच्या फायनान्स कंपनीकडून दीड कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करुन देतो" असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीला अरुण राणा नावाच्या व्यक्तीने सातत्याने संपर्क साधत त्यांचा विश्वास संपादीत  केला. त्यानंतर त्याने कर्ज मंजूर करुन देतो, त्यासाठी विविध प्रकारचे शुल्क आकरणीच्या नावाखाली त्यांनी  ८ लाख १० हजार रुपये बँक खात्यात वर्ग करण्यास सांगितले. त्यानुसार, त्यांनी पैसे वर्ग केले. मात्र रक्कम स्वीकारुनही संबंधित फायनान्स कंपनीने कर्ज देण्यासंदर्भात टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कदम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com