

Allegations of Corruption Ignored as RTO Officer Promoted
sakal
पुणे: राज्याच्या परिवहन विभागाने लाचखोर आरटीओ अधिकाऱ्याला पदोन्नतीचे बक्षीस देण्याचे ठरविले आहे. राज्यातील ४० सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना उप प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदी पदोन्नती देण्यासाठी सोमवारी (ता. ९) अधिसूचना प्रसिद्ध केली. यात राजेंद्र केसकर या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याचादेखील समावेश केला आहे.