-प्रफुल्ल भंडारी
दौंड : भूमी अभिलेख विभागाच्या दौंड येथील उपअधीक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी व एका खासगी इसमाला दहा हजार रूपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले आहे. मोजणी नकाशाची प्रत उपलब्ध करून देण्याकरिता शेतकऱ्याकडे महिला कर्मचाऱ्याने लाच मागितली होती.