महत्वाची बातमी : पुणे-सोलापूर महामार्गाला धोका; वाकडा पुल येथील भराव खचला

रमेश वत्रे
Thursday, 15 October 2020

वाखारी (ता. दौंड ) पुणे सोलापूर महामार्गावरील वाकडा पुल येथील भराव खचला असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

केडगाव (जि. पुणे) : वाखारी (ता. दौंड ) पुणे सोलापूर महामार्गावरील वाकडा पुल येथील भराव खचला असल्याने वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वाकडा पुल येथे मोठा ओढा आहे. काल रात्रीच्या पावसाने व ओढ्यातील पाण्याने या भरावाला हानी  पोहचली. आणि आज दुपारनंतर या भरावाची माती ढासळू लागली. सोलापूरकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनमध्ये हा धोका निर्माण झाला आहे.

Pune Rain:पुण्यात आज काय घडतंय? परीक्षा पुढे ढकलल्या, महापालिकेची हेल्पलाईन सुरू

भरावाची माती हळूहळू ढासळत असताना ही या मार्गावरून वाहतूक चालू आहे. याबाबत महामार्ग व्यवस्थापनाला कळवूनही या ठिकाणची वाहतूक बंद करण्यास विलंब होत असल्याची तक्रार या भागातील नागरिकांनी केली आहे. भरावाची माती खचू लागल्याने महामार्गाच्या कठड्याला लावलेले रेलिंग मोकळे होऊ लागले आहेत. या पुलाच्या दक्षिण पट्ट्यामध्ये डोंगर भाग आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. या पावसाचा येवा या पुलाखालून जात आहे. 

(संपादन :सागर दिलीपराव शेलार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bridge on the Pune-Solapur highway damaged