
निरगुडसर - पुलाचे काम होऊन तब्बल सात वर्ष लोटली. परंतु एका बाजुकडुन पुलाला जोडणारा २०० मीटरचा रस्ता अजुनही चिखलात अडकला आहे, मीना नदीवरील वळती-नागापुर (ता. आंबेगाव) या दोन्ही गावाला जोडणा-या पावणेतीन कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आल्याने परीसरातील सात गावातील प्रवासी वाहतुकदारांचा प्रश्न मिटला. परंतु आजही ये-जा करताना चिखलातुन जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वळती-नागापुर या दोन्ही गावांबरोबर परीसरातील वाहतुकीचा मार्ग सुलभ होण्यासाठी तत्कालीन अर्थमंञी व सध्याचे कामगार व उत्पादन शुल्कमंञी दिलीप वळसे-पाटील यांनी सन 2009 साली वळती-नागापुर या पुलाच्या कामासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. परंतु या पुलाचे कामसंबधित ठेकेदाराने संथगतीने केल्याने हे काम होण्यास तब्बल चार वर्षाचा कालावधी लागला. या पुलाचे काम पुर्ण होऊन तब्बल सात वर्ष लोटली. परंतु वळती गावाच्या बाजुकडुन पुलाला जोडणारा रस्ता पुर्ण झाला. परंतु नागापुर बाजुकडुन असलेला २०० मीटर रस्ता अजुनही अपुर्ण असुन चिखलात अडकला आहे.
या पुलामुळे नागापुर, वळती, शिंगवे, भागडी, पिंपरखेड, औरंगपुर, मंगरुळ-पारगाव या गावातील प्रवाशी व वाहतुकदारांना ये जा करण्यासाठी महत्वाचा मार्ग उपलब्ध झाला. परंतु, आजही या पुलावरुन प्रवास करताना नागापुर बाजुकडील पुलाला जोडणारा रस्ता खड्यात व चिखलात गेला आहे. या मार्गावरुन धोकादायक प्रवास करावा लागत आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने अनेक गाडया याठिकाणी घसरुन पडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
पुल असुन अडचण; अन् नसुन खोळंबा
पुलाच्या या रस्त्यावरुन तेथील काही स्थानिक शेतक-यांचा वाद सुरु असुन न्यायालयात केस सुरु असुन सात वर्ष झाले तरी ही बाब अदयाप निकाली नाही. हा वाद निकाली निघायला अजुन किती वर्ष लोटतात माहीत नाही. परंतु, या पुलाच्या चिखलमय रस्त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला असुन दररोज वाहने घसरुन पडत आहेत. त्यामुळे पुल असुन अडचण अन् नसुन खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.