पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रागावून घरातून निघुन गेलेला मुलगा सापडला

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 September 2020

शृंगेरी मठ येथे जाऊन येतो म्हणून गेलेला मुलगा संध्याकाळी घरी परत आला नाही. म्हणून चिंतीत झालेल्या आईने नातेवाईक व मुलाच्या मित्रांकडे शोध घेतला. परंतु तरीही मुलाचा शोध लागला नाही. तो कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला आहे असे उडतउडत समजले. त्यामुळे घाबरलेल्या आईने कोथरुड पोलिस ठाणे गाठले.

कोथरुड - शृंगेरी मठ येथे जाऊन येतो म्हणून गेलेला मुलगा संध्याकाळी घरी परत आला नाही. म्हणून चिंतीत झालेल्या आईने नातेवाईक व मुलाच्या मित्रांकडे शोध घेतला. परंतु तरीही मुलाचा शोध लागला नाही. तो कोणाच्या तरी गाडीवर बसून गेला आहे असे उडतउडत समजले. त्यामुळे घाबरलेल्या आईने कोथरुड पोलिस ठाणे गाठले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुष्पा अशोक कांबळे, वय - 33, रा. एकलव्य कॉलेज, कोथरुड या एका खाजगी रुग्णालयात कामाला आहेत. मुलगा गणेश हा टीव्ही पहात होता. नंतर तो जवळच असलेल्या शृंगेरी मठ येथे जातो असे सांगून घराबाहेर गेला. नंतर उशीर झाला तरी मुलगा न आल्याने आईच्या चिंता वाढल्या.

डॉक्टरांनो खाजगी हॉस्पिटलसोबतचे 'हित'संबंधांचे नाते तोडा; रुबल अग्रवाल यांची ताकीद

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी तक्रार दाखल करुन घेत तपासासाठी पोलिसांची टीम पाठवली. कोथरुड येथील मेडिकल पॉईंट येथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हरवलेला हा मुलगा नुकताच चांदणी चौकाच्या दिशेने गेलेला असल्याचे सांगितले. पोलिसांनी चांदणी चौकाकडे रवाना होत मुलाचा शोध घेवून आईच्या हवाली केले. आई सतत रागावते म्हणून रागावून घरुन निघून आलो असल्याचे चौदा वर्षाच्या गणेश कांबळे याने पोलिसांना सांगितले. गणेश व त्याच्या आईचे समुपदेशन करत पोलिसांनी त्यांना घरी पाठवले.  

राज्यातील एकल शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा प्राधान्याने विचार करू - हसन मुश्रीफ

पोलीस निरीक्षक किरण बालवडकर,  सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बाबर, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, काजळे यांच्या टीमने केलेल्या प्रयत्नामुळे रुसुन गेलेल्या मुलाची आई सोबत भेट घडवून आणणा-या पोलिसांचे कोथरुडकरांकडून कौतुक होत आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vigilance Pune police boy found angry and left the house