esakal | डॉक्टरांनो खाजगी हॉस्पिटलसोबतचे 'हित'संबंधांचे नाते तोडा; रुबल अग्रवाल यांची ताकीद
sakal

बोलून बातमी शोधा

Rubal-Agarwal

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खासगी हॉस्पिटलमधील अधिकाधिक जागा ताब्यात घेण्याची सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका केल्या आहेत.

डॉक्टरांनो खाजगी हॉस्पिटलसोबतचे 'हित'संबंधांचे नाते तोडा; रुबल अग्रवाल यांची ताकीद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - पुण्यातील कोरोना रुग्णांवरील उपचार व्यवस्था वाढविण्यासाठी खासगी हॉस्पिटलमधील "आयसीयू' आणि ऑक्‍सिजन बेड उपलब्ध करून घेण्यासाठी महापालिकेने प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांनाच रस्त्यांवर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. "हॉस्पिटलमध्ये जाऊन मोकळ्या बेड मिळवा, त्यात तुमचे हितसंबंध आडून आणू नका. अशा हॉस्पिटलसोबतचे नाते तोडा,' अशी सूचनावजा तंबी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुखांसह डॉक्‍टरांना दिली आहे. त्यामुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने खासगी हॉस्पिटलमधील अधिकाधिका जागा ताब्यात घेण्याची सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका केल्या आहेत. त्यानुसार तत्कालीन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आदेश काढत 81 खासगी हॉस्पिटलमधील 80 टक्के बेड अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून आजतागायत म्हणजे गेल्या तीन-साडेतीन महिन्यात जेमतेम सव्वापाच हजार 5 हजार बेड ताब्यात आल्या आहेत. याच हॉस्पिटलमधील आणखी दीड ते दोन हजार बेड मिळण्याची आशा आहे. 

राज्यातील एकल शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांचा प्राधान्याने विचार करू - हसन मुश्रीफ

नव्या उपाय आणि त्याचे परिणाम, याअनुषंगाने रुबल अग्रवाल यांनी आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तेव्हा, हॉस्पिटल व्यवस्थापनाला पाठिशी न घालण्याच्या सूचना केली आणि त्यांच्याशी एकाही अधिकाऱ्यांनी कोणतेही संबंध ठेवू नयेत, हेही सांगितले.

'सीईटी'च्या अर्ज भरण्याच्या वाढीव मुदतीचा तब्बल एवढ्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोरील "वॉईन शॉप'भोवतीची गर्दी होऊन सुरक्षिततेच्या उपायांकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित "वॉईन शॉप' गुरुवारी "सील' करण्यात आले. "सोशल डिस्टन्सिंग' न पाळणे, मास्क नसणे, एकाच ठिकाणी पाच-सहा लोक एकत्र आल्याने ही कारवाई करण्यात आली असून, यानिमित्ताने सुरक्षिततेचे उपाय न पाळणाऱ्या व्यावसायिकांना इशाराच दिला. अशा प्रकारची शहरात सर्वत्र केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अग्रवाल यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

loading image