शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या आठवणीला उजाळा.... | Babasaheb Purandare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Babasaheb Purandare
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या आठवणीला उजाळा....

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या आठवणीला उजाळा....

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर - इंदापूर तालुक्यातील वालचंदनगरमध्ये १९८०-८२ कार्यकाळ गाजला होता शिवशाहीर बाबाळासाहेब पुरंदरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रावरील व्याख्यानमालेने.... सलग तीन वर्ष पाच दिवसाच्या व्याख्यानमालेची आजही वालचंदनगरकरांना आठवण होत असून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे ज्येष्ठ नागरिकामधून हळहळ व्यक्त होत आहे.

१९८० दशकामध्ये महाराष्ट्रात शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानमाला सर्वत्र गाजत होत्या. वालचंदनगरमधील शिवप्रेमी व्यक्तिींच्या माध्यमातून १९८०-८२ सलग तीन वर्ष वालचंदनगर कंपनीच्या सहकार्याने भारत विहारमध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रावरील व्याख्यानमालाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग तीन वर्ष पाच दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली होती. व्याखान सुरु असताना टाचणी पडली तरीही आवाज होईल एवढी शांतता असायची.

हेही वाचा: Pune Crime : राजस्थानमधील सायबर चोरट्यांच्या टोळीला अटक

बाबासाहेबांच्या आवाजाने नागरिक मंत्रमुग्ध होत होते. त्यांचे व्याख्यान सुरु असताना इतिहासातील प्रसंगच जशाचातसा डोळ्यासमाेर उभा राहत होता. हे बाबासाहेबांच्या व्याख्यानाचे वैशिष्ठ असल्याचे ज्येष्ठ पत्रकार अतुल तेरखेडकर यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासाची त्यांनी सांगितले प्रसंग आजही आठवतात. सलग तीन वर्ष त्यांचा वालचंदनगर वाशियांना सहवास लाभला. अफाट स्मरणशक्ती व बारीक नजर हे त्यांचे वैशिष्ठ होते. त्यांना कारल्याची भाजी खूप आवडायची. तीन दिवस आमच्या

घरी त्यांनी जेवन केले. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्र पोरका झाला असून त्यांच्यासारखा व्यक्ता होणे शक्य नसल्याचे विवेकानंद ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सचिव सुरेश कापडी यांनी सांगितले.

loading image
go to top