बीआरटीत घुसखोरी; 60 वाहनांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

पुणे - नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या 60 खासगी वाहनांवर वाहतूक पोलिस व पीएमपीच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकाच्या मदतीने आता दररोज कारवाई होणार आहे.

पुणे - नगर रस्त्यावरील बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या 60 खासगी वाहनांवर वाहतूक पोलिस व पीएमपीच्या संयुक्त पथकाने कारवाई केली. दरम्यान, वाहतूक पोलिसांच्या विशेष पथकाच्या मदतीने आता दररोज कारवाई होणार आहे.

नगर रस्त्यावर येरवडा ते वाघोलीदरम्यान बीआरटी मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी दिली. 38 दुचाकी, 22 मोटारींवर कारवाई झाली आहे. या पुढील काळातहीही कारवाई सुरू राहणार असल्याचे गुंडे यांनी म्हटले आहे.

प्रवाशांना जलद, सुलभ, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक बससेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बीआरटी मार्ग सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्यातून खासगी वाहने सर्रास प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी बीआरटी मार्गात घुसखोरी करणारी वाहने जप्त करण्याचे सूतोवाच केले होते. खासगी वाहनांना बीआरटी मार्गात रोखण्यासाठी सुरक्षारक्षकही नियुक्त करण्यात आले होते; परंतु, त्यांना झुगारून प्रसंगी मारहाण करून वाहतूक होत असल्याचे दिसत होते. या पार्श्‍वभूमीवर खासगी वाहनांना रोखण्यासाठी पीएमपीने पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली आहे.

Web Title: BRT route crime on 60 vehicle