बीआरटी सेवेची वाट ठरतेय अडथळ्यांची

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

सद्य:स्थितीत एम्पायर इस्टेट उड्डाण पूल (चिंचवड स्टेशन) ते खराळवाडी, फोर्ब्ज मार्शल ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते वल्लभनगर या ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी मार्ग बंद आहे. त्यामुळे येथे बीआरटी प्रवास सेवा रस्त्याने सुरू आहे. बीआरटी मार्गावर काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास घुसतात. 

पिंपरी - पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी ते निगडी या दरम्यान बीआरटी मार्ग मेट्रोच्या कामासाठी तीन ठिकाणी बंद केला आहे. त्यामुळे या बससेवेची वाटचाल ही सध्या अडथळ्यांची झाली आहे. 

दापोडी ते निगडी या अंतरातील बीआरटी मार्ग २४ ऑगस्ट २०१८ ला खुला झाला. त्यानंतर हा मार्ग दुरुस्तीच्या विविध कामांसाठी सतत बंद ठेवण्यात येत होता. मेट्रोच्या कामासाठी सप्टेंबर २०१८ पासून महापालिकेसमोरील मार्ग बंद करण्यात आला. 

सद्य:स्थितीत एम्पायर इस्टेट उड्डाण पूल (चिंचवड स्टेशन) ते खराळवाडी, फोर्ब्ज मार्शल ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते वल्लभनगर या ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी मार्ग बंद आहे. त्यामुळे येथे बीआरटी प्रवास सेवा रस्त्याने सुरू आहे. बीआरटी मार्गावर काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने सर्रास घुसतात. 

खासगी वाहने बीआरटी मार्गात घुसू नये, यासाठी तेथे ट्रॅफिक वॉर्डन नेमले आहेत. खासगी वाहनांना मज्जाव करण्यासाठी ते दोरी लावून बसलेले असतात. तरीही, खासगी वाहनांची घुसखोरी सुरूच असते. 

‘महामेट्रोकडून निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर काही ठिकाणी सुरू असलेले काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. मात्र, त्या कालावधीत हे काम पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून महामेट्रोने संबंधित ठिकाणांवरील रस्ता दुरुस्त करून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करावा.

नाशिक फाटा ते पिंपरी या अंतरातील ग्रेडसेपरेटर मेट्रोच्या कामासाठी दररोज दुपारी १ ते ५ या वेळेत बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे सेवा रस्त्यावर अतिरिक्त ताण पडतो. बीआरटी बसची वारंवारिता दुपारी कमी असते. सेवा रस्त्यावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी खासगी वाहनांना वाहतूक शाखेच्या शिफारशीनुसार दुपारच्या वेळेत या मार्गाने प्रवास करण्यास परवानगी दिलेली आहे,’’ अशी माहिती बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

Web Title: BRT Service Problem Metro Work