‘बीएसएनएल’चा वीजपुरवठा खंडित

Electricity
Electricity

पुणे - भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कंपनीच्या अनेक दूरध्वनी केंद्रावरील वीजबिल थकल्यामुळे विद्युत महावितरण कंपनीने या केंद्रावरील वीज खंडित केली आहे. साधारण दोन ते तीन महिन्यांची ७० ते ९० हजारांपर्यंतचे बिल बीएसएनएलने भरलेले नाही. मात्र, याचा नाहक त्रास बीएसएनलच्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे. या तक्रारी सोडविण्यासाठी दूरध्वनी केंद्रावर गेलेल्या ग्राहकांना निराश होऊन परतावे लागत आहे.   

वीज बिलाच्या संदर्भात बीएसएनएल अधिकाऱ्यांनी महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बिल भरण्यासाठी मुदत मिळवली होती; परंतु बिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे, अशी माहिती बीएसएनएलच्या सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com