ब्रॉडबॅंड सेवेचा अखेर तिढा सुटला 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

पिंपरी - आतापर्यंत महापालिकेकडून खोदाई करण्यास परवानगी मिळत नसल्यामुळे भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) ब्रॉडबॅंड सेवा देण्यात अडचण येत होती. मात्र, पालिकेने त्याला हिरवा कंदील दाखवल्यामुळे अनेक दिवसांपासून अडकून पडलेला हा तिढा अखेर सुटला आहे. बीएसएनएलने महापालिकेला खोदाई शुल्क भरल्यानंतर येत्या एक ते दीड महिन्यात हा प्रश्‍न मार्गी लागणार आहे, असे बीएसएनएलचे उपव्यवस्थापक जे. ए. बुडावी यांनी "सकाळ'ला सांगितले. 

महापालिकेकडून बीएसएनएलला रस्ता खोदाई करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे शहरातील काही भागांत मागणी असून, ब्रॉडबॅंड सेवा देता येत नव्हती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून हा प्रश्‍न भिजत पडला होता. खोदाईसाठीची मोठी रक्‍कम महापालिकेला देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत तिचा भरणा करण्यात येणार असल्याने अखेरीस पालिका प्रशासनाने खोदाईसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागला आहे. बीएसएनएलला शहरात एक किलोमीटरची खोदाई करावी लागणार असली, तरी त्यामध्ये विविध भागांचा समावेश आहे. सुरवातीला पिंपरी, चिखली, मासुळकर कॉलनी या भागात 250 मीटरची खोदाई करण्यात येणार आहे. या ठिकाणचा तांत्रिक दोष दुरुस्त झाल्यानंतर सुमारे 300 जणांना ब्रॉडबॅंडची सेवा उपलब्ध होणार आहे, असेही बुडावी यांनी स्पष्ट केले.

Web Title: BSNL issue slove