पेन्शनधारकांचे आज आंदोलन

पेन्शनधारकांचे 
आज आंदोलन
Published on

पुणे, ता. २० : बीएसएनएल, एमटीएनएल पेन्शनर्स असोसिएशन महाराष्ट्रतर्फे केंद्र सरकारच्या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित महागाई भत्ता आणि महागाई भत्ता वाढीच्या मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २१) सातारा रस्त्यावरील प्रधान महालेखापाल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. संघटनेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे, की १ जानेवारी २०२६ पासून लागू असलेला महागाई भत्तावाढ अद्याप लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यातील हजारो निवृत्त कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनात बीएसएनएल आणि एमटीएनएलचे सुमारे ५०० पेन्शनधारक सहभागी होणार असून नागपूर, नाशिक, चंद्रपूर, कोल्हापूर, ठाणे, पुणे आदी भागांतील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com