हडपसर येथे महापालिकेच्या खोदकामाने बीएसनएल सेवा विस्कळीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने हजारो ग्राहकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली. मंगळवारी पहाटे दोन वाजता विस्कळीत झालेली सेवा दुपारी चारपर्यंत सुरू झालेली नव्हती. 

हडपसर - मगरपट्टा रस्त्यावर नोबेल रूग्णालयाजवळ महापालिकेने खोदकाम केल्याने हडपसर, मांजरी, खराडी, मगरपट्टा या भागातील, लॅंडलाईन, मोबाईल व इंटरनेट, सीसी टिव्ही सेवा बंद झाली. महापालिकेने कोणतीही पूर्व परवानगी न घेता खोदकाम काम केल्याची माहिती बीएसएनल विभागाच्या सूत्रांनी दिली. बीएसएनएल सेवा विस्कळीत झाल्याने हजारो ग्राहकांची मोठया प्रमाणात गैरसोय झाली. मंगळवारी पहाटे दोन वाजता विस्कळीत झालेली सेवा दुपारी चारपर्यंत सुरू झालेली नव्हती. 

बीएसएनएस मजदूर संघाचे आॅल इंडीया डेप्युटी जनरल सेक्रेटरी चांगदेव सरोदे म्हणाले, महापालिकेने कोणतीही परवानगी न घेता येथे याठिकाणी खोदकाम करून पाईप लाईन टाकली. त्यामुळे या भागातील ब्रॅाडबॅंड सेवा, मोबाईल आणि लॅंण्डलाईन सेवा बंद झाली आहे. शहरातील सर्व सीसीटिव्ही यंत्रणा बंद पडली आहे. त्यामुळे महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

बीएसएनएलचे सब डिव्हीजनल इंजीनीअर एल. डी. चिलोरी म्हणाले, मंगळवारी पहाटे दोन वाजता महापालिकेने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी विनापरवानगी खोदकाम केले आहे. त्यामुळे आमच्या विभागाच्या केबल तुटल्या आहेत. त्यामुळे  हडपसर, मांजरी खराडी परिसरातील पंधरा टेलिफोन एक्सचेंजची सेवा बंद आहे. ब्रॅाडबॅंड सेवा बंद असल्याने शासकीय कार्यालये, आयटी कंपन्या, बॅंकामधील व्यव्हार ठप्प झाले आहे. तसेच २० मोबाईल टॅावर बंद पडले आहेत. दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: BSNL service disrupted at hadapsar