डिजिटल इंडियात 'बीएसएनएल' '3 जी' वरच अडकले 

pune.jpg
pune.jpg

पुणे : इंटरनेटची '4 जी' सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम '3 जी' सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने '4 जी' सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू असल्याची टीका 'मिशन राजीव' कॉंग्रेसने केली. 

बीएसएनएल च्या ग्राहकांसाठी तातडीने '4 जी' सेवा सुरू करावी या मागणीसाठी 'मिशन राजीव'च्या वतीने बाजीराव रस्त्यावरील 'बीएसएनएल' कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी "मिशन राजीव'चे संस्थापक व कॉंग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक गोपाळ तिवारी, माजी आमदार मोहन जोशी, माजी नगरसेवक शिवा मंत्री, शहर कॉग्रेस उपाध्यक्ष बाळासाहेब मारणे, पीएमटी कामगार संघ इंटकचे अध्यक्ष राजेंद्र खराडे आदी उपस्थित होते. 

तिवारी म्हणाले, 'बीएसएनएल'चे कोट्यवधी ग्राहक '4 जी' सेवेपासून वंचित आहे. यासाठी त्यांना खासगी कंपन्यांकडे जावे लागत असून यामधून बीएसएनएलचे मोठे नुकसान होत आहे. रिलायन्स कंपनीच्या जिओ व इतर खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रचंड मोठा घोटाळा असून याची महालेखापाल द्वारे चौकशी करण्यात यावी. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला. 

डिजिटल इंडियात '4 जी' सेवा नाही 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचा मोठा गवगवा केला परंतु, मागील चार वर्षांपासून बीएसएनएल या सरकारी कंपनीची 4जी सेवा ते सुरू करू शकले नाहीत. डिजिटल इंडिया ही सरकारी कंपन्यांसाठी नसून केवळ खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे का? असा प्रश्‍न कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. 

''आमच्या कुटुंबातील बहुतेक सर्व सदस्य अनेक वर्षांपासून बीएसएनएल वापरत आहे. पण सध्या त्याचा उपयोग केवळ येणारे फोन उचलण्यासाठी केला जातो. दुसऱ्यांना फोन आणि इंटरनेटची सुविधा वापरण्यासाठी इतर कंपन्यांचे सीम कार्ड आम्ही वापरतो.''
- अभिजित साळुंखे, ग्राहक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com