अर्थसंकल्पामुळे देशात अच्छे दिन येणार - अर्थतज्ज्ञ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

‘भारतीय अर्थव्यवस्था भक्‍कम असून, केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात देशात अच्छे दिन येणार,’’ असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले. पिंपरीतील मघनमल उधाराम महाविद्यालयातर्फे अर्थसंकल्पावर आयोजिलेल्या परिसंवादामध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात ज्येष्ठ सनदी लेखापाल चंद्रशेखर दोशी, निवृत्त मुख्य प्राप्तिकर आयुक्‍त नरेशकुमार शर्मा, सनदी लेखापाल रवी सोमाणी यांनी सहभाग घेतला.

पिंपरी - ‘भारतीय अर्थव्यवस्था भक्‍कम असून, केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामुळे आगामी काळात देशात अच्छे दिन येणार,’’ असल्याचे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले. पिंपरीतील मघनमल उधाराम महाविद्यालयातर्फे अर्थसंकल्पावर आयोजिलेल्या परिसंवादामध्ये तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात ज्येष्ठ सनदी लेखापाल चंद्रशेखर दोशी, निवृत्त मुख्य प्राप्तिकर आयुक्‍त नरेशकुमार शर्मा, सनदी लेखापाल रवी सोमाणी यांनी सहभाग घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या वेळी दोशी म्हणाले, की ‘‘प्राप्तिकरात दिलेली सूट, उद्योगांसाठी राखीव ठेवण्यात आलेला निधी, कृषी क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदी यामुळे पुढील पाच वर्षांत देशातील अर्थव्यवस्था अधिक भक्‍कम होण्यास मदत होणार आहे.’’ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी पुरेशा प्रमाणात खेळते भांडवल उपलब्ध होण्याची आवश्‍यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

‘‘आधारकार्डवरूनच पॅनकार्ड करण्याची तरतूद केली आहे. प्राप्तिकर खात्याला बॅंक, केंद्रीय उत्पादनशुल्क विभाग या माध्यमातून होणाऱ्या सर्व व्यवहारांची माहिती सहजपणे मिळते. पुढील काही वर्षात त्यात आणखी बदल होणार आहेत. शेअर बाजारातील व्यवसायातही पारदर्शकता आली आहे. एलआयसी बाबत केंद्र सरकाने उचललेली पावले सकारात्मक आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या भवितव्यासाठी चांगला आहे,’’ असे मत शर्मा यांनी या वेळी व्यक्त केले.

‘‘वस्तू आणि सेवा कर कायदा लागू केल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चांगली चालना मिळाली आहे. आगामी काळात जीएसटी कायद्यात काही बदल अपेक्षित,’’ असल्याचे रवी सोमाणी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ऋषी लोढा आणि पंकज आगरवाल यांनी केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Budget will bring good days in the country