भोसरीत जुन्या भांडणावरून एकावर भरदिवसा गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

नाना लांडगे असे गोळीबार केलेल्याचे नाव आहे. तर प्रशांत (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गोळीबार झाला आहे. या दोघांमध्ये पुर्वीची भांडणे आहेत. या रागातून नाना याने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास गवळी माथा येथे प्रशांत यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये ते बचावले.
 
पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकावर गोळीबार केल्याची घटना मंगळवारी (ता.4) सकाळी भोसरीतील गवळीमाथा येथे घडली.

तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीला अजय देवगण सिंहगडावर येणार?
 
नाना लांडगे असे गोळीबार केलेल्याचे नाव आहे. तर प्रशांत (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यावर गोळीबार झाला आहे. या दोघांमध्ये पुर्वीची भांडणे आहेत. या रागातून नाना याने मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास गवळी माथा येथे प्रशांत यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये ते बचावले.

पीएमपी बससेवेचा मोठा निर्णय

घटनेची माहिती मिळताच भोसरी एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली असून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

पर्यावरण कर भरा अन्‌ जुने वाहन चालवा!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing on one due to old disputes at Bhosari Pimpri