Pune Crime : बुधवार पेठेत कुंटणखान्यावर छापा टाकून बांगलादेशी महिलांसह सातजण ताब्यात

पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांसह सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
crime
crimeesakal

पुणे - शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांसह सातजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर छापा टाकून ही कारवाई केली.

बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत बांगलादेशी बेकायदा वास्तव्य करीत आहेत. तसेच, अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकून मुलीची सुटका केली. पाच बांगलादेशी महिलांसह सातजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक निरीक्षक अश्विनी पाटील, अनिकेत पोटे, राजेश माळगावे, राजेंद्र कुमावत, बाबासाहेब कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनीषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण, हणमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, रेश्मा कंक यांच्या पथकाने ही कारवाई केली. सामाजिक सुरक्षा विभागाने मागील आठवड्यात बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतून बांगलादेशी महिलांसह नऊजणांना ताब्यात घेतले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com