म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ

Milk
Milk

कात्रज - दूध खरेदी दरात वाढ होतानाच वीज आणि डिझेलच्या दरातसुद्धा वाढ झाल्याने दूध वाहतुकीत तोटा सहन करूनही संघाला या आर्थिक वर्षात दोन कोटी चाळीस लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, भविष्यातील आव्हानांचा विचार करून दूध संस्थांना सात टक्के लाभांश आणि दूध उत्पादकांना प्रति लिटर पन्नास पैसे दर फरक देणार असल्याची घोषणा पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी केली. तसेच एक ऑक्‍टोबरपासून म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात दोन रुपयांनी वाढ होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी दूध संस्थांचे प्रतिनिधी आणि दूध उत्पादकांचे स्वागत केले. हिंगे म्हणाले, दुग्धव्यवसायातील राष्ट्रीय स्तरावरील ‘क्वालिटी मार्क’ हे गुणवत्ता व शुद्धतेची हमी असलेले मानचिन्ह संघाच्या उत्पादनावर वापरण्यास एनडीडीने मान्यता दिली हा बहुमान आहे. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ हा क्वालिटी मार्क मिळालेला राज्यातील पहिला संघ आहे. कोंढापूरी दूध शीतकरण केंद्र येथे प्रति तास ५ टन क्षमतेचा पशुखाद्य कारखाना उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.  संघाने दुग्धजन्यपदार्थांची ऑनलाईन विक्री सुरू केली असल्याची माहिती हिंगे यांनी दिली.

उत्कृष्ट काम करणाऱ्या सतरा आदर्श दूध संस्थांचा सन्मान करण्यात आला. स्वच्छ दूध उत्पादनास प्रोत्साहन देणेच्या उद्देशाने गिफ्टपॅक देऊन गौरविण्यात आले. या सभेस आजी माजी संचालक, दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संघाचे कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com