बांधकाम व्यावसायिकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

संदीप घिसे
मंगळवार, 1 मे 2018

सोमानी बिल्डर (रा. पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. सुनील जनार्दन सावंत (वय ४१ रा. गावडे भोवळ आळी, चिंचवडगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पिंपरी : पार्किंगच्या जागी फ्लॅट असल्याचे सांगून एका ग्राहकाची फसवणूक केली. या प्रकरणी सोमानी बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सोमानी बिल्डर (रा. पुनावळे) असे गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. सुनील जनार्दन सावंत (वय ४१ रा. गावडे भोवळ आळी, चिंचवडगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमानी बिल्डर यांची पुनावळे येथे 'सोमानी ड्रीम होम' ही साइट सुरू आहे.

या साईटवरील इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर पार्किंगची जागा असताना त्या जागी सोमानी यांनी सावंत यांच्याकडून फ्लॅटचे बुकिंग घेतले. त्यासाठी एक लाख ७१ हजार रुपये घेतले. तसेच फ्लॅट व पैसे परत न देता सावंत यांची फसवणूक केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक न्यामणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: builder cheating case in Pimpri