बिल्डर महिलेची भागीदाराकडून फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पुणे - बांधकाम क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलेची भागीदाराने तब्बल साडेनऊ कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात भागीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

प्रेमलता कुलकर्णी (वय ७२, रा. पाषाण रस्ता) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कुलकर्णी या दि नेस्ट कन्स्ट्रक्‍शन या कंपनीमध्ये भागीदार आहेत. त्यांनी दुसरे भागीदार चारुदत्त जोशी यांना विश्‍वासाने भागीदारी संस्थेचे खाते चालविण्याचा अधिकार दिला. मात्र, त्यांनी कुलकर्णी व अन्य भागीदारांची संमती न घेता संस्थेच्या खात्यातून फेब्रुवारी २०१४ ते जून २०१७ या कालावधीत साडेनऊ कोटी रुपयांचा अपहार केला. 

जोशी यांनी ही रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये वर्ग केली. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रार अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए. एस. देशमुख तपास करत आहेत.

Web Title: Builder women cheating crime

टॅग्स