

येरवडा चौकात लघुशंका कऱणाऱ्या आणि अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला पोलिसांनी कराडमध्ये अटक केलीय. त्याआधी त्याने एक व्हिडीओ व्हायरल करत माफीही मागितली. सर्व जनतेची आणि शिंदे साहेबांची माफी मागतो असं गौरव म्हणाला होता. त्यानं सकाळी दारू ढोसली होती आणि रात्री सरेंडर केल्यानं आता प्रश्न उपस्थित होत आहेत. रक्ताच्या तपासणीत दारूचा अंश सापडू नये यासाठी उशिरा सरेंडर केलं असल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, आता गाडीत दारूची बाटली घेऊन बसलेल्या मित्राला पोलीस ठाण्यात इतर मित्रांनी बर्गर आणि कोल्ड कॉफीचं पार्सल आणल्याची माहिती समोर येतेय. गौरवसोबत तेव्हा गाडीत असलेल्या मित्राचं नाव भाग्येश ओसवाल असं आहे.