
शिक्रापूर येथील गार्डन सिटी सोसायटीतील एकाने परगावी जायचे म्हणून दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने विश्वासू शेजा-याकडे संभाळायला दिले. पत्नीच्या आजारामुळे हा शेजारी पत्नीसह त्याच दिवशी पुण्यात दवाखान्यात गेला आणि तिथेच राहिला. हीच नामी संधी साधून चोरट्यांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी ठेवलेल्या ६ लाख ६८ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला.
पुणे शिक्रापूर - येथील गार्डन सिटी सोसायटीतील एकाने परगावी जायचे म्हणून दहा तोळ्याचे सोन्याचे दागिने विश्वासू शेजा-याकडे संभाळायला दिले. पत्नीच्या आजारामुळे हा शेजारी पत्नीसह त्याच दिवशी पुण्यात दवाखान्यात गेला आणि तिथेच राहिला. हीच नामी संधी साधून चोरट्यांनी एकाच वेळी, एकाच ठिकाणी ठेवलेल्या ६ लाख ६८ हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी. येथील गार्डन सिटी सोसायटीमधील दत्तात्रय ढमढेरे यांच्या शेजारी राहणारे जयवीर सिंग यांनी गावी जाताना त्यांच्या जवळील दहा तोळे सोन्याचे दागिने व रोख पंधरा हजार रुपये एवढी रक्कम ढमढेरे यांच्याकडे २३ तारखेला ठेवण्यास दिली होती. ढमढेरे हे २४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पत्नीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पुण्यात जात असताना त्यांनी जयवीर यांचे दहा तोळे सोन्याचे दागिने तसेच पंधरा हजार रुपये तसेच ढमढेरे यांचे स्वत:चे दहा तोळे सोन्याचे दागिने व तेवीस हजार रुपये रोख रक्कम असे सर्व स्वत:चे कपाटात ठेवून ते हॉस्पिटलमध्ये गेले व त्या दिवशी ते तिथेच राहिले.
व्याजाच्या पैशांवरुन व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण
दूस-या दिवशी पहाटेचे सुमारास ढमढेरे यांच्या शेजा-यांच्या निर्दर्शनास आले की, ढमढेरे यांचे घर उघडे आहे. याबाबत ढमढेरे यांना फोन करुन बोलाविले असता वरील चोरीचा प्रकार उघडकीस आला. या संपूर्ण चोरी प्रकरणात दोन्ही कुटुंबाचा एकत्रित ठेवलेला ऐवज चोरीला गेला असून सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींपर्यंत लवकरच पोहचू अशी आशा तपास अधिकारी राजेश माळी यांनी व्यक्त केली.
Edited By - Prashant Patil