esakal | बारामतीत शिवसेनेकडून चिनी वस्तूंचे दहन  
sakal

बोलून बातमी शोधा

baramati shivsena

शिवसेनेचा 54 वा वर्धापनदिन आज बारामतीत साजरा केला गेला. यानिमित्त चिनी वस्तूंचे दहन शिवसैनिकांनी केले.

बारामतीत शिवसेनेकडून चिनी वस्तूंचे दहन  

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : शिवसेनेचा 54 वा वर्धापनदिन आज बारामतीत साजरा केला गेला. यानिमित्त चिनी वस्तूंचे दहन शिवसैनिकांनी केले.

घाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..

जिल्हाप्रमुख अॅड. राजेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील काटेवाडी येथे शिवसेनेच्या नामफलकाचे पूजन केले गेले. चीनने गलवन घाटी येथे भारतीय सैनिकांवर केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून चीनी वस्तूंचे दहन शिवसैनिकांनी केले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचेही दहन कार्यकर्त्यांनी केले. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. या वेळी चीनच्या निषेधाच्याही घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब शिंदे, उपतालुका प्रमुख सुभाष वाघ, कन्हेरीचे सरपंच सतीश काटे, शाखाप्रमुख युवराज काटे, ग्रामपंचायत सदस्य राहुल काटे, पांडुरंग काटे, उमेश गायकवाड, गणेश शिंदे,  पप्पू काटे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.