पुणेः कात्रज-देहूरोड महामार्गावर अपघातात 30 महिला जखमी

राजेंद्रकृष्ण कापसे
सोमवार, 12 डिसेंबर 2016

वारजे माळवाडी (पुणे): कात्रज-देहूरोड या पश्चिम बाह्यवळण महामार्गावर मध्यरात्री सव्वा दोन दोन वाजता वडगाव बुद्रुक-वारजे माळवाडी सनसिटीच्या मागे बस पलटी झाल्याने अपघात सुमारे 30 महिला जखमी आहेत. जखमींपैकी तिघींची प्रकृती गंभीर आहे.

भोसरी (मोशी) येथील धंनजय आल्हाट यांनी महिलांची कोल्हापूर सहल आयोजित केली होती. त्यातील ही एक बस आहे. 27 जखमी महिलांना उपचारासाठी ससूनला पाठविले आहे. गंभीर जखमींना वारजे माळवाडी येथील माई मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वडगाव बुद्रूक येथील काँग्रेसचे पदाधिकारी हरिदास चरवड यांची केदारनाथ रुग्णवाहिका व कार्यकर्ते मदतीला आले होते. याच बरोबर गुरुपसाद, आशाशक्ती व 108 च्या दोन अशा 5 रुग्णवाहिका आल्या होत्या. त्यांनी जखमींना रुग्णलयात दाखल केले. सिंहगड रोड पोलीस ठाणे, सिंहगड रोड अग्निशामक दलाचे वाहन घटनास्थळी आले होते, त्यांनी जखमींना बस बाहेर काढले.

Web Title: bus accident in pune