Pune Bus Service : पुण्यात विमानतळपासून सहा मार्गांवर शुक्रवारपासून बससेवा

पीएमपीची अभि (एअरपोर्ट बस फॉर बिझिनेस ॲंड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) विमानतळ बससेवा शुक्रवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे.
PMP Bus
PMP BusSakal
Summary

पीएमपीची अभि (एअरपोर्ट बस फॉर बिझिनेस ॲंड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) विमानतळ बससेवा शुक्रवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे.

पुणे - पीएमपीची अभि (एअरपोर्ट बस फॉर बिझिनेस ॲंड हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटी) विमानतळ बससेवा शुक्रवारपासून (ता. १६) सुरू होणार आहे. ही बस ६ मार्गांवरून धावणार आहे. त्यासाठी नियमित दरात तिकिट आकारणी होणार असून ही बस सर्व थांब्यांवर थांबेल.

पुण्यातील लोहगाव विमानतळावरून ६ विविध मार्गांवर एसी ई -बसद्वारे बससेवा सुरू होणार आहे. अभि एअरपोर्ट बससेवेचे मार्ग हे बिझनेस व हॉटेल इंटरकनेक्टिव्हिटीच्या दृष्टीकोनातून तयार केलेले असल्याने या बससेवेसाठी विशेष तिकीटदर आकारण्यात येत होते.

हे दर जास्त असल्यामुळे प्रवाशांचा पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. ही बाब लक्षात घेऊन विमानतळ बससेवेची प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढीसाठी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी तिकीट दरामध्ये फेररचना करून नियमित बससेवेच्या दरात प्रवाशांना वाहतुकीची सेवा उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून ही बससेवा सुरू होणार आहे. विमानतळापासून ही बससेवा सुरू होणार आहे. त्यासाठी ई- बस वापरण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांच्या बॅग्ज त्यात सहज ठेवता येतील, असे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या मार्गांवर सुरू होणार बससेवा

अ.क्र. मार्ग क्र. व मार्गाचे नाव मार्गे बस संख्या फेऱ्या वारंवारिता

- लोहगाव विमानतळ ते हिंजवडी, माण फेज ३ - शिवाजी चौक, पुणे विद्यापीठ गेट, मनपा भवन, पुणे स्टेशनमार्गे

- विमानतळ ते भेकराईनगर (हडपसर) - हडपसर गाडीतळ, मगरपट्टा, खराडी बायपास चौक, हयात हॉटेल

- विमानतळ ते स्वारगेट - पूलगट, वेस्ट एंड टॉकीज, पुणे स्टेशन, ब्ल्यु डायमंड हॉटेल, शास्त्रीनगर चौक

- विमानतळ ते कोथरूड स्टॅण्ड - गुडलक चौक, लोकमंगल, मनपा भवन, पुणे स्टेशन, ब्ल्यु डायमंड हॉटेल, गोल्फ क्लब

- विमानतळ ते निगडी - चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, लांडेवाडी कॉर्नर, भोसरी, मॅग्झीन चौक, विश्रांतवाडी

- विमानतळ ते निगडी - चिंचवड स्टेशन, नाशिक फाटा, वाकडेवाडी, पुणे स्टेशन, शास्त्रीनगर रोड, हयात हॉटेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com