उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

हडपसर - सासवड रस्त्यावरील पुलाखालील पीएमपी बस थांबा कृष्णाछाया हॉटेलशेजारी स्थलांतरित केला. मात्र, त्या ठिकाणी प्रवाशांसाठी उभारलेले शेड अपुरे पडत आहे. त्यामुळे उन्हामध्ये प्रवाशांना बसची प्रतीक्षा करावी लागत असून, शेड उभारण्याची मागणी होत आहे. 

शेवाळेवाडी, भेकराईनगर आणि हडपसर बस डेपोतून येणाऱ्या बस या थांब्यावर थांबतात. शेड अपुरे पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवासी भर उन्हात रस्त्यावर बसची वाट पाहत असतात. प्रवासी सविता वाघमारे म्हणाल्या, ‘‘हा थांबा स्थलांतरित केल्यामुळे पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला निवारा कमी पडत आहे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी मोठे शेड उभारण्याची गरज आहे.

प्रायोगिक तत्त्वावर हा थांबा स्थलांतरित करण्यात आला होता. त्यामुळे तात्पुरता निवारा प्रवाशांसाठी करण्यात आला आहे. या ठिकाणी लवकरच प्रवाशांसाठी मोठे शेड उभारण्यात येईल.
- सुभाष गायकवाड, जनसंपर्क, पीएमपी

Web Title: bus waiting in summer