Pune CrimeSakal
पुणे
Pune Crime:'व्यावसायिक वादातून गोळी झाडून मित्राचा खून'; दोन मित्रांना पोलिस कोठडी, चऱ्होलीतील खून प्रकरण..
Shocking Murder in Charholi: वादातून अमित आणि विक्रांत यांनी मिळून नितीन यांच्या डोक्यात गोळी झाडली. या हल्ल्यात नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याबाबत सचिन शंकर गिलबिले (वय ४०, चऱ्होली) यांनी फिर्याद दिली आहे.
पुणे: व्यावसायिक वादातून चऱ्होलीतील अलंकापुरम चौक परिसरात गोळी झाडून मित्राचा खून केल्याप्रकरणात दिघी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. अमित जीवन पठारे (वय ३५) आणि आकाश पठारे विक्रांत ठाकूर (दोघेही रा. चऱ्होळी) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

