ग्रामीण भागातही स्मार्टफोनच्या मदतीने आता...

मिलिंद संगई, बारामती
Sunday, 3 May 2020

लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेला व्यवसाय काहीही करुन पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत अनेकांनी अनेक युक्त्या शोधून काढत आपापल्या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला.

बारामती :....गरज ही शोधाची जननी असते, असे म्हटले जाते. या लॉकडाऊनच्या काळात ठप्प झालेला व्यवसाय काहीही करुन पुन्हा नव्याने सुरु करण्याबाबत अनेकांनी अनेक युक्त्या शोधून काढत आपापल्या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट फोनच्या मदतीने स्मार्ट व्यवसायाच्या दिशेने अनेकांनी पावले टाकली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लॉकडाऊनच्या काळात सगळंच ठप्प झाल्याने स्मार्ट फोन हेच सर्व बाबींचे मुख्य केंद्र बनलेले असल्याने या स्मार्ट फोनच्या माध्यमातून प्रत्येकापर्यंत विविध मार्गाने पोहोचण्याचा प्रयत्न अनेकांनी स्थानिक स्तरावर केला आणि त्याला ब-यापैकी यशही आले.

'आरोग्य सेतू'ची 'ती' लिंक आली असेल तर सावधान...

ग्राहकांना पुरवठादार व पुरवठादारांना ग्राहकांपर्यंत पोचण्यासाठी स्मार्टफोनचेच माध्यम प्रभावी असल्याने अनेक छोट्या व्यावसायिकांनीही त्याचा वापर करत स्मार्ट व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. भाजीपाल्यापासून ते फळांपर्यंत व बेकरी उत्पादनांपासून ते किराणा मालापर्यंत अनेक गोष्टींची विक्री फेसबुक व व्हॉटसअँपच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न अगदी छोट्या व्यावसायिकांनी केला.

नेहमीची व्यापाराची पद्धत लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने ग्राहकराजाच्या दारात जाऊन वस्तूंची विक्री करण्याचा फंडा व्यावसायिकांनी अंगीकारण्याचा प्रयत्न करत संकटातही संधी शोधली.

अनेक भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी गाड्या लावून विक्री करत उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला, तर अनेक बेकरी व्यावसायिकांनीही घरपोच सेवेची जाहीरात करत उत्पन्न मिळविले. काही उत्साही विक्रेत्यांनी तर थेट वडापावही तर काहींनी हापूस आंबेही घरपोच देण्याची योजना दिल्याने अनेकांनी त्याचा फायदा घेतला.

पुण्यात अडकलेले विद्यार्थी म्हणताहेत, 'कोरोनाऐवजी आम्ही उपासमारीने मरू'

दरम्यान, लॉकडाऊनमुळे सगळेच ठप्प झालेले असल्याने आवडीच्या पदार्थांसह जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनीही व्हॉटसअँपसह फेसबुकच्या जाहिरातीतील फोननंबरवर संपर्क करत घरपोच वस्तू मिळविल्या. 
अडचणी आल्या तरी त्यावर मात करत विक्रीव्यवस्था कायम राखत व्यवसायाला उर्जितावस्था आणण्याचा ग्रामीण भागाचा हा प्रयत्न ख-या अर्थाने स्मार्ट असाच म्हणावा लागेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Business with the help of smartphones even in rural areas