Startup : स्टार्टअपसाठी ‘बूटस्ट्रॅपिंग’ची भूमिका महत्त्वाची

व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याआधारे निर्माण केलेले उत्पादन बाजारात चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी, तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे भांडवल सर्वांत महत्त्वाचे ठरत आहे.
Business Startup
Business Startupsakal

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी दिले जाणारे धडे. देशात वाढत असलेले स्टार्टअप कल्चर. झपाट्याने विस्तारत असलेले व्यवसाय आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढलेले नवकल्पनेचे प्रमाण, यामुळे गेल्या काही दिवसांत स्टार्टअपची संख्या वाढत आहे. यासाठी त्यांच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘बूटस्ट्रॅपिंग’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि त्याआधारे निर्माण केलेले उत्पादन बाजारात चांगल्या प्रकारे मांडण्यासाठी, तसेच गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी हे भांडवल सर्वांत महत्त्वाचे ठरत आहे. सुरुवातीला उद्योजकाकडे पुरेसे भांडवल असतेच असे नाही. आहे त्या भांडवलावर त्याच्या व्यवसायाचा प्रवास सुरू होतो.

‘बूटस्ट्रॅपिंग’मधून जे कामकाज सुरू होते, त्याचा आधार घेत नवउद्योजक गुंतवणूकदारांना आकर्षित करतो. त्यांनी गुंतवणूक केल्यानंतर खऱ्या अर्थाने स्टार्टअप वाढते. मात्र, त्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी पुरेसे ‘बूटस्ट्रॅपिंग’ असणे स्टार्टअपसाठी आवश्‍यक ठरते.

‘बूटस्ट्रॅपिंग’चे फायदे

  • भांडवल उभे करणे काहीसे सोपे

  • गुंतवणूकदारांचा दबाव टाळता येतो

  • कंपनीची मालकी टिकवून ठेवण्यास मदत

  • स्टार्टअप अपयशी झाल्यास कर्जाचा डोंगर डोक्यावर नसतो

  • उद्योगात नवनवीन प्रयोग करण्यात जास्त धोका राहत नाही

  • गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी फायद्याचे होते

‘बूटस्ट्रॅपिंग’ म्हणजे नेमके काय?

स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार सुरू झाल्यानंतर त्यात सर्वांत महत्त्वाची बाब ठरते ते म्हणजे भांडवल. व्यवसायाची कल्पना खूप छान आहे. मात्र त्यासाठी पुरेसे भांडवल नाही, असे अनेकांच्या बाबतीत घडते. पण व्यवसाय सुरू करण्याची जिद्द नवउद्योजकाला शांत बसू देत नाही. स्वतःकडे, कुटुंबाकडे आणि काही प्रमाणात मित्रांकडून पैसे घेत व्यवसायाची घौडदौड सुरू होते. हे पैसे किंवा भांडवल म्हणजेच ‘बूटस्ट्रॅपिंग’.

...तर मोठी गुंतवणूक मिळत नाही

‘बूटस्ट्रॅपिंग’ हे एक प्रकारे बिटा मॉडेल ठरत आहे. प्रायोगिक तत्त्वावर या निधीचा वापर होतो. म्हणजे जर स्टार्टअप यशस्वी झाला, तर त्यात यश मिळते. नाहीतर स्टार्टअपमधून पुरेसे यश मिळाले नाही. तसेच कंपनी बंद पडल्यानंतर होणारा तोटा सहन करता येतो. त्यामुळे ‘बूटस्ट्रॅपिंग’वर सुरू केलेला स्टार्टअप फसल्यास पुढे मोठी गुंतवणूकही मिळत नाही. या सर्वांचा विचार करता हे भांडवल अत्यंत काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे, असा सल्ला या क्षेत्रातील तज्ज्ञ देतात.

बूटस्ट्रॅपिंग नसेल, तर स्टार्टअप पुढे जाऊच शकत नाही. आपल्या स्टार्टअपची कल्पना किती योग्य आहे? आपल्या उत्पादनाला बाजारात मागणी आहे का? उत्पादन व मागणी कायम राहील का? या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी भांडवल कामाला येते. ‘बूटस्ट्रॅपिंग’ हे मर्यादित प्रमाणात असते. त्यामुळे त्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे. कारण ‘बूटस्ट्रॅपिंग’मध्ये यशस्वी झालो, तरच गुंतवणूकदार पैसे गुंतवतात. गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास तयार करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा ठरतो. कल्पना प्रस्थापित करून ती सिद्ध करण्यासाठी हे भांडवल अत्यावश्यक आहे.’’

- डॉ. अनंत सरदेशमुख, स्टार्टअप व्यवस्थापन सल्लागार

भांडवलाचे पर्याय

  • बूटस्ट्रॅपिंग

  • क्राउडफंडिंग

  • एंजल फंड

  • व्हेंचर कॅपिटल

  • मायक्रोलोन्स

  • एसबीए

  • सरकारी योजना

  • विविध कर्ज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com