
उरुळी कांचन : एका व्यावसायिकाला व्यवसायात भागीदारी करून नफा कमवून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी १३ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना कदमवाकवस्ती परिसरात घडली. या प्रकरणी मोईन मुन्नई खान (सध्या रा. समतानगर, कदमवाकवस्ती ता. हवेली , मूळ रा.घर नंबर ७९६/७ पुराणा रसुलपुर, फिरोजाबाद, उत्तरप्रदेश) व अब्दुल कलीम खान फैजुल्लाखान (सध्या रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली, मूळ रा. जलाली मोहल्ला, मडगाव, जि. जळगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.