पुणे: कोरेगाव पार्क परिसरात व्यावसायिकाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात ही घटना घडली. विशाल विजयसिंह लावंड (वय 42, रा.कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. लावंड यांची मेडीकलची दोन दुकाने होती. या दुकानांमध्ये त्यांना तोटा झाला होता.

पुणे : व्यवसायामध्ये झालेल्या तोटयामुळे आलेल्या नैराश्यतुन एका व्यावसायिकाने पिस्तुलातुन गोळी झाडुन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी रात्री घड़ला.

कोरेगाव पार्क या उच्चभ्रु परिसरात ही घटना घडली. विशाल विजयसिंह लावंड (वय 42, रा.कोरेगाव पार्क) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. लावंड यांची मेडीकलची दोन दुकाने होती. या दुकानांमध्ये त्यांना तोटा झाला होता. त्यामुळे ते काही दिवसांपासून नैराश्येत होते. त्यातुनच त्यांनी पिस्तुलातुन स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

रविवारी रात्री उशिरा कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यु म्हणुन या प्रकाराची नोंद करण्यात आली.

Web Title: businessman suicide in Pune