esakal | Big Breaking : पुण्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा निर्णय, काय आहे ते वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

rajistar.jpg

ग्रामीण भागातील दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.

Big Breaking : पुण्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोठा निर्णय, काय आहे ते वाचा सविस्तर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ग्रामीण भागातील दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (ता. 18) ग्रामीण भागातील सर्व 21 दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होणार असून, नागरिकांना सदनिका, दुकाने, जमीन आदींची खरेदी-विक्रीचे व्यवहार नोंदविता येणार आहे. 

पुण्यातील खव्वयांसाठी महत्वाची बातमी; आधी वाचा मग ऑर्डर करा

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात 17 मे 2020 लॉकडॉऊन सुरु आहे. ज्या-ज्या भागात परिस्थिती नियंत्रणात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. अशा भागातील दुय्यम निबंधक कार्यालये, मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालये व विशेष विवाह कार्यालये पुरेशी खबरदारी घेऊन  (ता. 18 मेपासून) सुरु होणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे. 

दस्तनोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये कार्यान्वित करताना व त्यापुढील कामकाज करताना कर्मचारी व नागरिक यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. सहजिल्हा निबंधक, पुणे ग्रामीण यांच्या अधिपत्याखाली सर्व 21 कार्यालये दस्त नोंदणीसाठी सुरू करण्यास परवानगी दिली आहे. 

सोशल डिस्टंसिंगचं उल्लंघन केल्यावर साफ करावं लागणा टॉयलेट

जिल्ह्यात बारामती तालुक्‍यातील सह दुय्यम निबंधक वर्ग-2, कार्यालय बारामती क्रमांक-1 सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालय बारामती क्रमांक-2, शिरुर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय शिरुर व तळेगाव ढमढेरे, दौंड तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय दौंड व केडगाव, भोर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय भोर, वेल्हा तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेल्हा, इंदापूर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय इंदापूर, जुन्नर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय जुन्नर व नारायणगाव, आंबेगाव तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय आंबेगाव, पुरंदर तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय पुरदंर, मुळशी तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय मुळशी 1 (पौड) व मुळशी 2 (हिंजवडी), मावळ तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ, तळेगाव दाभाडे व लोणावळा, खेड तालुक्‍यातील दुय्यम निबंधक कार्यालय, खेड 1, खेड 2 (चाकण), खेड 3 ही कार्यालये सुरु होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहरात अजूनही कोरोना बाधितांची संख्या कमी झाली नाही. शहरात कंटेन्मेंट झोन केले असून, ठराविक दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र दस्त नोंदणीची दुय्यम निबंधक कार्यालये सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरू होण्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

loading image