पुणे : आयटीतील तरुणीवर कॅब चालकाचा बलात्कार; गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट! 

rape file
rape file

पुणे : आयटी कंपनीत नोकरीला असणाऱ्या तरुणीवर कॅब चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटले तरीही अद्याप चालकाला अटक करण्यात आलेली नाही. ४ ते ३० मार्च या कालावधीत अनेकदा हा प्रकार घडला आहे. या तरुणीचे अश्‍लिल फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत कॅब चालकाने तरुणीवर अत्याचार केले.

दिल्लीतील शेतक-यांचं आंदोलन पेटवणा-यांनाच पुरस्कार; कंगणा भडकली

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रमोद बाबू कनोजिया (रा. कर्वेनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कॅब चालकाचे नाव आहे. याप्रकरणी खराडी परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी एका आयटी कंपनीमध्ये नोकरीला आहे. आरोपी हा ओला कंपनीच्या कॅबवर चालक म्हणून काम करीत आहे. 

४ मार्च रोजी तरुणीने मांजरी परिसरातून घरी जाण्यासाठी ओला कॅब बुक केली होती. त्यानुसार आरोपी हा कॅब घेऊन आला. तरुणी मांजरी परिसरातून कॅबमध्ये बसली. त्यावेळी चालकाने तरुणीना पिण्यासाठी पाणी दिले. पाण्यामध्ये गुंगीचे औषध घातले असल्याने पाणी पिल्यानंतर तरुणीला गुंगी आली. तरुणी बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने आरोपीने तरुणीला धायरी येथील गोकूळ लॉजवर नेले. तेथे तरुणीची कपडे काढून मोबाईलवर तिची छायाचित्रे काढली. ही छायाचित्रे सोशल मीडीयावर टाकण्याची धमकी देऊन त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी संबंधीत छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर अत्याचार केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. 

भारतासाठी धोक्याची घंटा; चीन तिबेटमध्ये उभारणार जगातील सर्वांत मोठं धरण

याप्रकरणी तरुणीने शुक्रवारी फिर्याद दाखल केली. बलात्कारासाख्या गंभीर घटनेचा गुन्हा दाखल होऊन तीन दिवस उलटून गेले तरी अजूनही हडपसर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com