Pune : खळद येथे तरसाच्या हल्ल्यामध्ये वासराचा मृत्यू

यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
Pune
Pune SAKAL
Summary

यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

खळद : खळद (ता.पुरंदर) येथे खळद फाटा नजीक असणाऱ्या पाटील वस्ती येथील शेतकरी साहेबराव विठ्ठल कामथे यांच्या गोठ्यातील वासरावरती तरसाने हल्ला केल्याने वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नेहमीप्रमाणे ते गोठ्याकडे गेले असता त्यांना छिन्न विछिन्न अवस्थेमध्ये वासराच्या मृत्यू झाल्याचे पाहावयास मिळाले.

यावेळी वासराच्या मानेला चावा घेतला होता तर दोन पायाच्या मध्यभाग खाल्ला होता. तर आजुबाजूच्या परिस्थितिची परिस्थिती पाहिल्या वरती वन्यप्राण्याने हा हल्ला केल्या असल्याचे त्यांना जाणवले व बाजुला असणाऱ्या पायाच्या ठशांवरून हा हल्ला बिबट्याने केला असल्याचा संशय त्यांना आल्याने त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला.

माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पायाच्या ठश्यावरून सदर हल्ला हा तरसाने केला असल्याचे सांगितले. यावेळी परिंचे वनपाल अनिल खोमणे,जेजुरीचे वनपाल राहुल रासकर, वाॅचमन सोमनाथ खटाटे, सहायक अक्षय जाधव,सहायक किरण होले ,सासवडचे वनपाल शीतल बागल यांनी सहकार्य केले.

"शिवरी गावच्या बाजूला असणाऱ्या डोंगरांमध्ये बिबट्याचा वावर आहे येथे बिबट्याच्या हल्याच्या घटनाही घडल्या आहेत मात्र खळद मध्ये यापूर्वी अशी कोणतीही घटना घडली नाही अथवा बिबट्याचे वास्तव्य असल्याचे कोणाच्याही निदर्शनास आले नाही तरी सदर हल्ला हा बिबट्याने केला नसुन तासाने केला आहे.

तरीही शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत गाफील न राहता रात्रीच्या वेळी फिरताना ग्रुपने फिरावे तर आपले असणारे जनावरांचे गोटे हे बंदिस्त करावेत जेणेकरून अशा हल्ल्यांपासून आपले गाई, वासरे,जनावरे सुरक्षित राहतील असे आवाहन जेजुरीचे वनपाल राहुल रासकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com