मुलांनी अनुभवला शिबिराचा आनंद

मुलांनी अनुभवला शिबिराचा आनंद

मधुरांगण सभासद, वाचकांसाठी नोंदणी सुरू; थोड्याच जागा शिल्लक   

पुणे - निसर्गाच्या सान्निध्यात संस्कार, क्रीडा, मनोरंजन असे विविध अनुभव देणाऱ्या ‘सकाळ-मधुरांगण’ व ‘सूर्यशिबिर’ यांच्या दोन, तीन व चार दिवसांच्या शिबिरांच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता या शिबिरांसाठी थोड्याच जागा शिल्लक आहेत. यापूर्वी झालेल्या शिबिरात मुलांनी विविध अनुभव घेत धमाल केली.

सात ते पंधरा वयोगटातील मुला-मुलींसाठी होणाऱ्या या शिबिरांत ट्रेकिंग, रॉक क्‍लायबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, बर्मा ब्रिज, रायफल शूटिंग, बर्ड वॉचिंग, ऑबस्टॅकल गेम्स, पोहणे, आकाश निरीक्षण, कॅम्प आउट, कल्चरल प्रोग्रॅम, ग्राउंड गेम्स अशा विविध उपक्रमांचा समावेश वेगवेगळ्या दिवसांच्या शिबिरांनुसार असणार आहे. याव्यतिरिक्त प्रदूषण नियंत्रण, सिटी फार्मिंग, बायोगॅस प्लांट, सोलर वॉटर हिटर, सोलर सेल आणि बॅटरीजच्या कार्यपद्धतीबरोबर शास्त्रोक्त पद्धतीने सूर्यनमस्कार, आकाश निरीक्षण अशा ॲक्‍टिव्हिटीजही आहेत. प्रशिक्षित प्रशिक्षक मुलांना मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषांद्वारे मार्गदर्शन करतील. प्रत्येक १५ विद्यार्थ्यांसाठी एक ग्रुप लीडर मार्गदर्शनासाठी असणार आहे. शिबिर शुल्कामध्ये निवास व्यवस्था, शाकाहारी जेवण, फिल्टर्ड वॉटर व पुण्यापासून प्रवास खर्चाचा समावेश आहे.
पूर्ण शुल्क भरून शिबिरासाठी नावनोंदणी करणाऱ्यांना रोखीने सवलत मिळेल. धनादेशाने शुल्क भरूनही प्रवेश नक्की करता येईल. ‘सूर्यशिबिर अँड रिसॉर्ट’ वर्षभर कौटुंबिक, वैयक्तिक व व्यावसायिक सहलींसाठीही उपलब्ध असणार आहे.

येथे करा नोंदणी 
‘सकाळ-मधुरांगण’ विभाग, सकाळ मुख्य कार्यालय, दुसरा मजला, ५९५, बुधवार पेठ, शनिवारवाड्याजवळ  
सूर्यशिबिर रिसॉर्ट - यशश्री, ११, काका हलवाई इंडस्ट्रीअल इस्टेट, सातारा रस्ता, सिटी प्राइडच्या समोर.  
अधिक माहितीसाठी - ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२ (सकाळी ११ ते सायंकाळी ६)


सूर्यशिबिरांच्या तारखा  -  पूर्ण फी भरून शिबिरसाठी नावनोंदणी करणाऱ्यांसाठी सवलत
१) २ दिवसांचे शिबिर -  १-२ मे, २) ३ दिवसांचे शिबिर ः १५ ते १७ मे, ३) ४ दिवसांचे शिबिर - ८ ते ११ मे
आतापर्यंतच्या शिबिरातील बेस्ट कॅम्पर पुरस्काराचे मानकरी - दिव्या गडकरी, आर्य भोईटे, सम्प्रीती वैद्य आणि आदित्य गोफणे.

शिबिरार्थींच्या प्रतिक्रिया
सिमरन कोकजे - शिबिरातील व्यवस्था छान होती. रेन डान्स मुळे मूड रिफ्रेश झाला. 
अर्पिता जोशी - रॅपलिंग खूप आवडले. रात्री स्टार गेझिंगला मजा आली. खूप माहिती मिळाली. डोंगरावरून तळ्याचे दृष्य मनमोहक वाटते. 
रोनक कोठारी - स्वीमिंग करायला मजा आली, पक्षी आवडले. त्यांना खायला घालायचा आनंद मिळाला, ससेपण आवडले.
समृद्धी भागवत - शिबिराची जागा खूप सुंदर. जेवणांत पावभाजी, नुडल्स, मंच्युरियन शेवपुरी खूप आवडली. 
सोहम कोकाटे - शिबिरात खूप मजा केली. प्रशिक्षक खूप चांगले होते. दादा, ताई आमच्याशी प्रेमाने वागले. कॅम्प फायरला मजा आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com