Video : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकऱण...खासदार अमोल कोल्हे...सोशल मीडियात एकच चर्चा...

ks.jpg
ks.jpg

पुणे : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकऱणावर आता पडदा पडला आहे. हा वाद मिटविण्यात शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मध्यतंरी या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. यामध्ये खासदार कोल्हे यांनी नण्याच्या दोन्ही बाजू तपासा असे सांगितले होते. यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली होेती. आता याच टीकेला अनेकजण सोशल मीडियाव्दारे उत्तर देत आहेत. बर्याच लोकांनी कोल्हे यांच्या समर्थनार्थ 'आय सपोर्ट अमोल कोल्हे' अशी मोहीम सुरु केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

मागील काळात सोशल मीडियावर अक्षय बोऱ्हाडे नामक एका तरुणाने एक व्हिडीओ टाकत आपणास सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा दावा केला होता. यानंतर या प्रकरणावरून खुप मोठा गदारोळ उडाला. अनेक राजकीय नेत्यांनी यात भुमिका घेतली. काही लाेकांनी अक्षय यास पाठींबा दिला तर काहींनी शेरकर यांना पाठींबा दिला.

यामध्ये खासदार अमोल कोल्हे यांनी आपल मत व्यक्त केलं होतं. अक्षय बोऱ्हाडेंच्या अनुषंगाने मला अनेकांचे फोन आले. अक्षयच्या कामाचं मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. त्यामुळे, याप्रकरणी नाण्याची दुसरी बाजू तपासून पाहणेही तितकेच गरजेचे आहे. तरी, याप्रकरणात कोणावर अन्याय झाला असेल तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न उद्भवत नाही. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना संबंधित पोलीस खात्याला मी आधीच केली आहे, असे कोल्हे यांनी म्हटले होते.

दरम्यान यावरून त्यांना काही राजकीय संघटनांकडून टारगेट करण्यात आले. आता याच मुद्द्यावरून कोल्हे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियात मोहीम सुरु झाली आहे.  अनेकांनी फेसबुक, इस्टाग्राम, टि्वटर वरून खासदार कोल्हे यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. अनेकांनी सांगितले की जो व्यक्ती स्वत:चे घर विकून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार मालिकेव्दारे जनतेपर्यंत पोहचवतो तो व्यक्ती अशा प्रकरणात चुकीची भूमिका घेणार नाही. तसेच अनेकांनी अमोल कोल्हे यांची भूमिका योग्य होती, मात्र काही राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी जाणीवपुर्वक त्यांना टारगेट केले असा दावा केला आहे.   

कोल्हेंसंदर्भातील या भूमिकेवरुन विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या टि्वटर अकाऊंटवरुन कोल्हेंची बाजू घेतली आहे. ''शिखंडीच्या आडून बाण मारू पाहणाऱ्यांनी एक कायम लक्षात घ्यावे राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हेजी महाराष्ट्रातील तमाम तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यांना चुकीच्या पद्धतीने बदनाम कराल तर भविष्यात फक्त जप करत बसावं लागेल, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी खासदार अमोल कोल्हेंची बदनामी करणाऱ्यांना, त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना लक्ष्य केलं आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com