....तरच "फास्टॅग' असलेल्या वाहनांना 'टोल प्लाझा'वरून मोफत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

शहरातून महामार्गावरून प्रवेश करताना आता टोल नाक्‍यांवर फास्टॅग आता सक्तीचा झाला आहे. तो नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे. मात्र, कारला फास्टॅग लावला आहे. परंतु, टोल नाक्‍यावर तो स्कॅन किंवा रिड झाला नाही तर, वाहनचालकांकडून टोलची रोख स्वरूपात रक्कम घेतली जात आहे

पुणे : तुमच्या "कार'मध्ये फास्टॅग आहे....पण, टोल प्लाझावर तो स्कॅन झाला नाही तर, टोलसाठी पैसे देऊ नका. कारण तुमच्या टोल अकाऊंटमध्ये बॅलन्स शिल्लक असेल तर तुम्हाला मोफत सोडले जाईल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातून महामार्गावरून प्रवेश करताना आता टोल नाक्‍यांवर फास्टॅग आता सक्तीचा झाला आहे. तो नसल्यास वाहनचालकांकडून दुप्पट टोल आकारला जात आहे. मात्र, कारला फास्टॅग लावला आहे. परंतु, टोल नाक्‍यावर तो स्कॅन किंवा रिड झाला नाही तर, वाहनचालकांकडून टोलची रोख स्वरूपात रक्कम घेतली जात आहे. तसेच रोख रक्कम दिल्यावरही फास्टॅगची रक्कम अकाऊंटमधून वळती होत असल्याचे जात आहे, असाही अनुभव काही वाहनचालकांना येत आहे.

‘इंटरनेट हॅंडलिंग चार्जेस’च्या नावाखाली चित्रपटाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगमधून लूट

या पार्श्‍वभूमीवर पुणे- सातारा टोल रोडचे महाव्यवस्थापक अमित भाटीया म्हणाले, "प्रवाशाचा फास्टॅग टोल प्लाझावर स्कॅन झाला नाही तर, 'मॅन्यूअल' उपकरणावर तो स्कॅन केला जातो. परंतु, त्यावरही तो स्कॅन झाला नाही तर, मिस्ड कॉलमार्फत त्या वाहनचालकाच्या फास्टॅग अकाऊंटमध्ये बॅलन्स आहे का, हे तपासले जाते. बॅलन्स असेल तर त्या वाहनचालकाकडून टोलचे पैसे घेतले जात नाही.''

पुण्यातील 'या' परिसरातील पाण्याचे वेळापत्रक अजूनही कोलमडलेलेच

केंद्र सरकाराने याबाबत काढलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी सुरू आहेत. सर्वच टोल नाक्‍यांवर ऑटोमॅटिक टोल स्कॅनर आणि मॅन्यूअल टोल स्कॅनर ठेवण्यास सांगण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Can go free through toll Plaza only If fastag does not scan