अशी शक्कल आपण भारतात लढवू शकतो का?

टीम ई सकाळ
शनिवार, 22 एप्रिल 2017

पुण्यातील बाणेर रस्त्यावर सोमवारी (17 एप्रिलला) भीषण अपघात घडला. त्यात दोनजण दगावले. अशा घटना वारंवार समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत.

पुण्यातील बाणेर रस्त्यावर सोमवारी (17 एप्रिलला) भीषण अपघात घडला. त्यात दोनजण दगावले. अशा घटना वारंवार समोर येत राहतात. पुण्यातील वाहतुकीला नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करायला हवे, त्यामध्ये नागरिकांनी व प्रशासनाने कोणती भूमिका बजावायला हवी, याबद्दल वाचकांनी सविस्तर प्रतिक्रिया 'ई सकाळ'ला कळविल्या आहेत. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया संकलित स्वरुपात इथे देत आहोत : 
 

1. रितेश खडसे यांनी लिहिले आहे की पुण्यातील ट्रॅफिकबद्दल आणि खास करून पादचाऱ्यांबद्दलचा आपला लेख वाचला. मला सुचवावेसे वाटते की, शिवाजीनगरच्या शिमला ऑफिस चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी पुणे महापालिकेने थोडासा खर्च करून रस्ता ओलांडण्यासाठी वरून पादचारी पूल उभारावेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूचे ट्रॅफिक बंद करून पादचाऱ्यांना तो पूल वापरू द्यावा. म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होईल. सिंगापूरमध्ये याचा वापर केला जातो. येथे स्मार्ट सिटी उपक्रमाच्या मार्केटिंगवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला गेला, मात्र नागरी जीवनात नगण्य सुधारणा झाल्या. 

2. 'सकाळ'चे वाचक अजित लिहितात की कॅनडामध्ये कोणत्याही रस्त्यावर जेव्हा एखाद्याला रस्ता ओलांडायचा असतो तेव्हा 'रिक्वेस्ट' बटन दाबायचे असते. काही सेकंदांमध्ये सिग्नल बोर्डवर पादचाऱ्यांसाठीचा सिग्नल दिसू लागतो जेणेकरून लोक सहज व सुरक्षितपणे रस्ता ओलांडू शकतात. सर्व वाहनांना हा सिग्नल पाळून थांबावे लागते, अन्यथा त्यांना दंड भरावा लागतो. आपण भारतात असे काहीतरी करू शकतो.

 •  जास्त वर्दळीच्या चौकांमध्ये रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांसाठीचे उड्डाणपूल असले तर त्यांना रस्त्यावरून जावे लागणार नाही. 
 •  कॅनडामध्ये तुम्हाला रस्ता बदलायचा असेल किंवा सर्व्हिस रोडवरून मुख्य रस्त्यावर जायचे असेल तर 10 ते 15 सेकंद थांबायचं. तुमच्या आधी आलेली सर्व वाहने पुढे निघून जातात आणि मागून आलेले लोक थांबून तुम्हाला जाण्यासाठी मार्ग मोकळा करतात. 
 • आपण भारतात वाहतुकीचे नियम, सुरक्षितता याबाबतचे शिक्षण देण्यास व जागृती करण्यास सुरवात करायला हवी. 
 • कोणीही सिग्नल किंवा नियम मोडले तरी त्याच्याकडून दंड वसूल केलाच पाहिजे. 
 •  ट्रॅफिक पोलिसांनी त्यांचे काम समर्पितपणे व प्रामाणिकपणे करायला हवे. 

3. वाहतुक सुधारणेसाठी सचिन यांनी खालील महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत -

 • शहरातील रस्त्यांवरील सिग्नलची संख्या कमी करावी. शहरात प्रत्येक 500 मीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावर असलेले सिग्नल बंद करण्यात यावे. साधारणपणे एखादी व्यक्ती 15 किमी प्रवास करते. या प्रवासा दरम्यान त्या व्यक्तीला कित्येक ठिकाणी सिग्नलमुळे धांबावे लागते. काही सिग्नल वर ट्राफिक जास्त असेल तर दोन-तीन वेळा सिग्नल सुटेपर्यंत तेथेच थांबावे लागते.
 • कोणत्याही रस्त्यावर 500 मीटर अंतरावर यु-टर्न घेण्यास परवानगी असावी. त्यामुळे राँग साईड ने गाडी चालवत येणाऱ्यांची संख्या कमी होईल.
 • मुख्य रस्त्यांवर बीआरटी आणि सायकल मार्ग दोन्हीही आहेत. यामुळे मुळ वाहतुकीसाठी कमी रुंदीचा रस्ता मिळतो. त्याऐवजी सायकल मार्ग अंतर्गत रस्त्यांवर असावेत. 
 • बीआऱटी मार्गावर प्रत्येक वेळी बस वाहतुक असतेच असे नाही. बऱ्याच वेळा हा मार्ग रिकामा असतो. कित्येकदा असेही होते की बीआरटी मार्ग मोकळा असतो व बाजुच्या रस्त्यांवर वाहतुक खोळंबलेली असते. अशा ठिकाणी खासगी बस आणि मोठ्या गाड्यांना बीआरटी मार्ग वापरायची परवानगी देण्यात यावी.
 • शहरात काही ठिकाणी गरज नसतानाही सिमेंट काँक्रिटचे अंतर्गत रस्ते आहेत. या रस्त्यांवर तितकी वाहतुकही नसते. अशा रस्त्यांवर पैसे खर्च करण्यापेक्षा नगरसेवकांनी तो निधी मोठ्या रस्त्यांसाठी व उड्डाणपुलासाठी वापरावा. 
 • शहरातील उड्डाणपुलांच्या खाली बऱ्याच ठिकाणी गर्दी आढळुन येते. उदा. डांगे चौक, के के मार्केट, विद्यापीठ इ. यावर उपाय योजना करण्यात याव्यात.
 • शहरातील रस्त्यांवर कोणत्यातरी कारणाने वर्षातुन एकदा तरी खोदकाम करण्यात येते. यामुळे रस्ते खराब होतात. रस्ते व्यवस्थित ठेवण्यासाठी एकदा रस्ता बनला कि किमान पाच वर्षे तो खोदला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.
 • शहरातील प्रत्येक रस्तावर अतिक्रमण आढळुन येते. यामुळेही वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. यावर प्रतिबंध घालण्यात यावा.
Web Title: can we do this to improve traffic?