

Panic in Pune as Canal Overflows, Water Enters Residential Societies
esakal
घोरपडी: मगरपट्टा सोसायटीच्या मागील बाजूस असलेल्या कालव्याला भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडत असून परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कॅनालमधून वेगाने वाहणारे पाणी रस्त्यावर येत असून मगरपट्टा सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे. तसेच हडपसर औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्यांमध्ये पाणी शिरले आहे .जवळच असलेल्या जहांगीर नगर येथील वस्तीमध्ये ही पाणी शिरत असून नागरिक भयभीत झाले आहेत.